Sunday 16 June 2024

कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा !!

कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा !!

  
वसई, प्रतिनिधी : उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरू झाली की विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरू होते. २०२४-२५ ह्या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्कर्ष विद्यालय मराठी माध्यमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मुग्धा लेले मॅडम आणि उपमुख्याध्यापिका श्रीमती. चित्रा ठाकूर यांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण केले. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक पद्धतीने  सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू आणि खाऊ देण्यात आला. प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना गाणी, गोष्टी सांगून आनंदाचे वातावरण निर्माण केले. 

यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  श्रीमती मुग्धा लेले व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. भक्ती वर्तक मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांचे विविध मनोरंजक खेळ घेऊन 'आनंददायी शनिवार' प्रत्येक वर्गात साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व सर्व सहकारी वर्ग  उपस्थित होते.

2 comments:

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...