आमदार दौलत दरोडा यांच्या प्रयत्नातून वाडा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 26 कोटींचा निधी मंजूर !!
वाडा, सचिन बुटाला : शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील शहापूर मतदारसंघातील सहा रस्त्यांसाठी 26 कोटी 24 लाख 59 हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांसाठी भरीव निधी मिळावा यासाठी स्थानिक आमदार दौलत दरोडा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. संबंधित रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर झाला असून या कामांच्या प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याने संबंधित गावातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सुटणार असून यासाठी ग्रामस्थांनी आमदार दरोडा यांचे विशेष आभार मानले आहेत.
शहापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाडा तालुक्यातील सहा प्रमुख रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर रस्ते पुढीलप्रमाणे -
1. गारगाव ते दाभोन रस्ता लांबी 5.20 किमी, (अंदाजित रक्कम रुपये आठ कोटी 74 लाख 54 हजार),
2. मुख्य रस्ता ते खैरे - सासणे जोडरस्ता लांबी 3.450 किमी (अंदाजित रक्कम रुपये पाच कोटी 28 लाख 54 हजार),
3. मुख्य रस्ता ते ठूनावे जोडरस्ता, लांबी 2.500 किमी (अंदाजित रक्कम रुपये तीन कोटी 87 लाख 21 हजार),
4. डाढरे ते कोलीम सरोवर रस्ता लांबी 2 किमी, (अंदाजित रक्कम रुपये तीन कोटी 27 लाख 21 हजार),
5. कोने ते मालोंडे रस्ता लांबी 1.750 किमी, (अंदाजित रक्कम रुपये दोन कोटी 70 लाख 98 हजार),
6. राज्य मार्ग 79 ते दुपारेपाडा - चिखले रस्ता लांबी 1.290 किमी, (अंदाजित रक्कम रुपये दोन कोटी 36 लाख 12 हजार),
No comments:
Post a Comment