Monday, 15 July 2024

माजी सैनिक, वीर नारींच्या वारसांसाठी पी.जी.डी.एम. व बी.बी.ए. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती !!

माजी सैनिक, वीर नारींच्या वारसांसाठी पी.जी.डी.एम. व बी.बी.ए. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती !!

पुणे, प्रतिनिधी : माजी सैनिक आणि वीर नारींच्या वारसांसाठी पी.जी.डी.एम (२ वर्षे) आणि बी.बी.ए. (३ वर्षे) कोर्ससाठी फ्यूएल बी स्कूल, पुणे यांच्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येत असून https://fuelfornation.com/hunar.php या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. 

पी.जी.डी.एम. अभ्यासक्रमासाठी स्नातक पदवी, अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांने सामान्य प्रवेश परीक्षा (कॅट), सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (सीएमएटी), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) किंवा पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (जीमॅट) दिलेली असावी. 

बी.बी.ए. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी हा १२ वी उत्तीर्ण असावा. तसेच राज्यातील सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिलेली असावी. अभ्यासक्रमाचा प्रारंभ जुलै किंवा ऑगस्ट २०२४ मध्ये होणार असून शिकवणी (ट्यूशन), बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भोजन आदी सुविधा देण्यात येणार आहेत. 

पुणे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि वीर नारींच्या वारसांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे स. दै. (नि.), यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्व मतदारसंघात लढत झाली एकतर्फी !! जनतेचा विश्वासाला खरे उतरणार - सुलभा गायकवाड  कल्याण, सचिन बुटाला : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ...