Tuesday, 23 July 2024

पत्रकार भिमराव धुळप यांना मातृशोक !!

पत्रकार भिमराव धुळप यांना मातृशोक !!
 

नवी मुंबई (प्रतिनिधी)

           समाजसेवक,पत्रकार आणि धगधगती मुंबई या वृत्तपत्राचे संपादक भिमराव धुळप यांच्या मातोश्रींचे सोमवारी २२ जुलै २०२४ रोजी निधन झाले. मृत्यूसमयी कै. बाळकाबाई हिंदुराव धुळप या ८७ वर्षांच्या होत्या. कोपरखैरणे सेक्टर १९ येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर तीन टाकी मुक्तीधाम स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील अनेक मान्यवर ,मित्र परिवार उपस्थित होता. बुधवारी दि २४ जुलै २०२४ रोजी त्यांचे रक्षाविसर्जन व इतर विधी कोपरखैरणे, नवी मुंबई येथे होणार आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...