Tuesday 23 July 2024

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चिराग आनंद यांनी सोमवारी (२२ जुलै) सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे सचिव सुमंत भांगे सर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चिराग आनंद यांनी सोमवारी (२२ जुलै) सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे सचिव सुमंत भांगे सर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

कल्याण, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे सचिव सुमंत भांगे सर यांचा सोमवारी २२ जुलै रोजी वाढदिवस होता या निमित्ताने अनेक सहकारी, कर्मचारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कल्याण शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व शिवसेना मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य विस्तारक चिराग आनंद यांनी सुध्दा सुमंत भांगे सरांना भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, यावेळी अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

चिराग आनंद यांचे सामजिक व वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे तसेच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सुध्दा त्याच्या कार्याचे कौतुक केले आहे. तसेच आमदार विश्वनाथ भोईर हे नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत असतात. 

चिराग आनंद यांनी सांगितले की सुमंत भांगे सर यांनी पदावर असताना नेहमीच सामाजिक हितासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत व सरांचे माझे वैयक्तिक हितसंबंध असून त्यांचे कार्य पाहून मला काम करण्याची उर्जा मिळते.

सुमंत भांगे सर यांनी सुध्दा सदिच्छेबद्दल प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते चिराग आनंद यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...