Thursday 25 July 2024

महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे वसई येथे निष्पाप बालकाचा बळी तर खारवली (वाडा) येथील शेतकऱ्याचे नुकसान !!

महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे वसई येथे निष्पाप बालकाचा बळी तर खारवली (वाडा) येथील शेतकऱ्याचे नुकसान !!


वाडा, प्रतिनिधी :  महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना महाराष्ट्रात नवीन नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गुरुवारी वसईतील भास्कर आळी नजीक नऊ वर्षाच्या मुलाचा खेळताना डीपी बॉक्सला हात लागून जागीच मृत्यू झाला. तर अशीच घटना खरिवली येथील शेतकरी शिवाजी अधिकारी यांच्या स्वतःच्या शेतात चिखल करत असताना अचानपणे लाईट चा पोल ट्रॅक्टर चालू असताना पोल ट्रॅक्टर वर पडून नुकसान झाले.

पावसाळ्यापूर्वी तब्बल अनेक तासांचे शट डाऊन करून वीज दुरुस्त्या केल्या जातात. विज व्यवस्था निर्धोक, सुरळीत राहील असा दावा केला जातो. प्रत्यक्षात तक्रारी देऊनही योग्य कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरीकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. अशा पद्धतीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने शहरात उघड्यावर असलेल्या वीजतारा, सैल झालेले पोल, डीपी बॉक्स यांची काळजी घ्यावी, अशी मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सामान्य नागरिक यांच्याकडून सातत्याने होते. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, किंबहुना त्यात हलगर्जीपणा दाखविला जातो.

अपघात झालेल्या घटनांची चौकशी करून अपघातास जबाबदार महावितरणचे अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे, अशी कारवाई झाली तर पुढील घडणाऱ्या अनर्थ घटनांना आळा बसेल.


No comments:

Post a Comment