Monday 26 August 2024

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे दिल्ली येथे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे दिल्ली येथे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांना शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया दिल्ली येथे नेल्सन मंडेला फेलोशिप अवॉर्ड आणि ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड -२०२४ वितरण समारंभात अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर डॉ.अविनाश सकुंडे, श्रेयांश मेहता (आय.एस), रमेश कुमार (उच्च न्यायालय- न्यायमूर्ती), सानीपिना जय लक्ष्मी राव- सोशल वर्कर, राजेश मुनोत - अँटी पक्राईम चीफ, दिल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रममध्ये विविध क्षेत्रातील लौकिक प्राप्त व्यक्ती यांचा पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात आला. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत नुकतीच करण्यात आली होती. याशिवाय गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल लांजा तालुक्यातील अनेक मान्यवर, सामाजिक संस्था, समाज मंडळ, कुणबी समाज शाखा, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, करंबळे परिवार नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...