Friday 23 August 2024

वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.तर्फे देवरुख येथील शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.तर्फे देवरुख येथील शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कोकण (शांताराम गुडेकर) :
              कोकणात "दूध प्रकल्प" घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून, इथल्याच मातीतल्या भूमिपुत्रांना घेऊन वाशिष्टी प्रकल्प सुरू झाला. आज त्याचा विस्तार होऊन आपण गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना रोजगार देऊ शकलो याचं समाधान आहे. माझी माणसं आणि माझे शेतकरी बंधू यांच्या सहकार्यामुळेच वाशिष्टी आज दिमाखात उभी आहे. असे मत वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.अध्यक्ष प्रशांत यादव ( नेते - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरद पवार /२६५ चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ ) कायमस्वरूपी व्यक्त करतात. कोकणातील पहिला दुग्ध भव्य प्रकल्प म्हणजे वाशिष्ठी....! "कोकणातील दुग्ध क्रांती"... अनेक प्रयोग करून उत्तम दर्जाचे दुग्ध पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. वाशिष्टीचे कोकणातील प्रत्येक माणसाशी  नाते आहे. विधानसभा शेत्र प्रमुख दत्ताराम लिंगायत यांनी प्रास्तावना केली.
             चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून सामाजिक नावलौकिक मिळवला आहे. तो वारसा वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पुढे नेत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी जे-जे करता येईल. तिथे वाशिष्ठी डेअरी कमी पडणार नाही, अशी ग्वाही वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी देताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्प भविष्यात शेतकऱ्यांचा प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट करतांना रत्नागिरी जिल्हा दुग्ध क्षेत्रात आर्थिक संपन्न प्रगतीवर नेण्याचे काम तुमच्यासारख्या मंडळींच्या सहकार्यातून करणार आहोत, असे प्रतिपादन यादव यांनी देवरुख येथे माटे-भोजने सभागृहात वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित शेतकरी मेळावा व कृषी कार्यशाळा प्रसंगी केले.

              यावेळी व्यासपीठावर एडवेटा मॅनेजर प्रतीक माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, देवरुख तालुकाध्यक्ष बाबा साळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरुख शहराध्यक्ष निलेश भुवड, माजी सभापती छोट्या गव्हाणकर, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, मुन्ना थरवळ, सी. एल. एफ. मॅनेजर सौ. ज्योती जाधव, देवरुख व्यापारी संघटना अध्यक्ष बाबा सावंत, मोहन वनकर, माजी सभापती संतोष लाड, पशुसंवर्धनच्या मानसी लोटणकर आदी उपस्थित होते. शिवाय शिवणे पोलीस पाटील मनोज शिंदे यांच्यासहित तालुक्यातील बहूसंख्य सरपंच, पोलीस पाटील, महिलावर्ग उपस्थित होता. यावेळी पत्रकार संदीप गुडेकर, सचिन मोहिते, सुरेश करंडे, मीरा शेलार, सुरेश सप्रे यांचा सत्कार अध्यक्ष प्रशांत यादव, स्वप्ना यादव यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी बांधवांना दुध किटली यानिमित्ताने देण्यात आल्या.
          यावेळी प्रशांत यादव पुढे म्हणाले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची उभारणी झाली आहे. तत्पूर्वी कोकणातील शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष राव चव्हाण यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांची दुधाची योग्य विक्री होत नव्हती. यामुळे आम्ही वाशिष्ठी डेअरी प्रकल्प सखोल अभ्यासांती उभारण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू देखील झाला आहे, असे सांगताना या प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेतला.
           यावेळी प्रशांत यादव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना शंभर टक्के रोजगार मिळेल अशी यानिमित्ताने ग्वाही दिली. आज तरुण वर्ग मुंबई शहरात जात आहे तो खेड्यातच राहिला पाहिजे. गाव तेथे वशिष्ठ मिल्कची डेरी उपलब्ध करून देऊन रोजगार दिला  जाईल. मारळ, बामणोली, ओझरे, आंगवली, सोनारवाडी या गावांसहित तालुक्यातील आणि चिपळूण तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी दुध व्यवसाय करणारे सर्व बंधू उपस्तित होते. कृषी कन्या श्रद्धा ढवण -ढोरमले यांनी चांगले मार्ग दर्शन केले. आपला अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवून शेतकरी काय करावे. काय करू नये याबाबत सखोल माहिती दिली. त्याच्या या अनुभवाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. त्यांचा गाव हा कोकणमधील नसून पण त्यांनी सकाळी गाईना कोणता चारा द्यावा. नेमके काय खाद्य घालायचे ते सांगितले. गायकडे फक्त आपण व्यवसाय दृष्टीने न पाहता आपल्या घरातील एक व्यक्ती, सदस्य आहे असं समजून पालन पोषण करावे. प्रेमाने त्या गायीला जोपासले, तिची चांगली निगा राखाली तर तिच्या पासून आपल्याला खूप फायदा होणार हे नक्की. तसेच गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत तयार करा. सकाळी चारा देता तो चांगला द्या. त्यामुळे मिळणारे दुधही चांगले मिळेल. ते चांगल्या भावाने मार्केटमध्ये जाईल. यासाठी सर्वांनी मेहनत घ्या. तसेच माझ्या अनुभवाचा फायदा घ्या. रोजगार निर्मितीवर भर द्या. हाताला काम मिळेल. आपण प्रगतशील शेतकरी बना असे कृषी कन्या श्रद्धा ढवण -ढोरमले यांनी सांगितले. शेवटी दुध डेरीच्या प्रमुख स्वप्ना यादव यांनी आभारप्रदर्शन करून मेळाव्याची सांगता केली.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...