Sunday 18 August 2024

सामाजिक जिव्हाळा फाउंडेशन संस्थेतर्फे शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

सामाजिक जिव्हाळा फाउंडेशन संस्थेतर्फे शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

मुंबई - ( दिपक कारकर ) :

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थेच्या वतीने महानगरपालिका शाळा क्रमांक ६१ ढोकाळी ठाणे येथे शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष शैलेश गायकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास येथील अनेक मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थचे खजिनदार दिलीप नाचरे यांनी केले. शाळेतील मुख्याध्यापक आणि संपूर्ण शिक्षक वृंद यांनी सुद्धा या उपक्रमाला अनुमोदन दिले. 

स्थानिक नगरसेवक सुद्धा या कार्यक्रमाला भेट देऊन कार्यक्रमाचे शोभा वाढवली. साहित्य वाटप झाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या संस्थेच्या कार्याध्यक्ष उदय गावडे यांच्याकडून मुलांसाठी चॉकलेट्स भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी सचिन मटकर यांनी खूप मेहनत घेतली. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत नियोजन करण्यासाठी दिपक मादगे, प्राजक्ता पवार, परेश धुमक, रविंद्र गांगरकर, पूजा सावंत मॅडम, गायकर मॅडम, नाचरे मॅडम यांचीही मोलाची साथ लाभली. या कार्यक्रमास पालकवर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होता. शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी हा स्तुत्य उपक्रम आहे अशा शब्दात गौरव केला आणि असेच कार्यक्रम तुम्ही आमच्या शाळेत राबवावेत अशी संस्थेकडे विनंती केली. संस्थेचे अध्यक्ष यांनी शब्द दिला की इथून पुढे आपल्या शाळेसाठी आम्ही असेच वेळोवेळी मदत करत राहू. एकूणच सर्व मुलांना शैक्षणिक वाटप करून कार्यक्रमाची सांगता वकृत्व स्पर्धेने पार पडली आणि शाळेने संस्थेचे आभार व्यक्त करून कार्यक्रमची सांगता केली. ह्या स्तुत्य उपक्रमाचे अनेक स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...