Monday 19 August 2024

श्री मार्लेश्वर देवालय (मठ) आंगवली मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने भक्त मंडळीचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

श्री मार्लेश्वर देवालय (मठ) आंगवली मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने भक्त मंडळीचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

आंगवली, (शांताराम गुडेकर) :
             रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.आंगवली येथे श्री मार्लेश्वर देवालय (मठ) मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने भक्त मंडळीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यानिमित्ताने निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील (राजकीय, सामाजिक, शिक्षण, वैद्यकीय, प्रसार माध्यम, पर्यावरण, अध्यात्मिक) अनेक मान्यवर व्यक्ती यांनी या मंदिरला भेटी देत दर्शन घेत मंदिर तर्फे आयोजित केलेल्या आरती, महाप्रसाद कार्यक्रममध्ये सहभाग घेतला.
         आज (दि. १९ ऑगस्ट २०२४) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.आंगवली येथील श्री मार्लेश्वर देवालय (मठ) मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने होणार्‍या महाप्रसाद,नामस्मरण निमित्त भक्त गण, भाविक यांनी मार्लेश्वर गाव देवाची महा आरती केली. श्रावण सोमवार निमित्त आज सर्व भाविकांना आंगवली करकोट वाडी यांच्या वतीने  महाप्रसाद देण्यात आला. यावेळी श्री मार्लेश्वर देवस्थान रिलीजस अँन्ड चॅरिटेबल ट्रस्ट आंगवली मंदिर पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने महाप्रसादचेही आयोजन करण्यात आले. हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...