Monday 19 August 2024

कर्जाने आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन; रोटरी क्लबच्या उपक्रम !

कर्जाने आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन; रोटरी क्लबच्या उपक्रम !

चोपडा, प्रतिनिधी - शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आपले जीवन जगत असताना चांगले वा वाईट अनुभव येत असतात. या अनुभवातून ते पुढे एक सुजाण नागरिक म्हणून तयार होत असतात. शालेय विद्यार्थ्यांच्या योग्य जडणघडणीसाठी तालुक्यातील कर्जाने येथील आश्रमशाळेत चोपडा येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब आणि समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'गुड टच व बॅड टच' या संकल्पना विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी व त्या बाबत जागृती करण्यासाठी डॉ. मोहिनी उपासनी (समाजकार्य महाविद्यालय, चोपडा) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपल्या आजूबाजूचे परिचित लोक, नातेवाईक आपणास कशा पद्धतीने स्पर्श करतात? त्या स्पर्शामध्ये चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कोणता असतो? याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कोणी आपल्या लैंगिक अवयव आणि वैयक्तिक भाग यांना मुद्दाम - सहेतुक स्पर्श करत असेल तर ते म्हणजे बॅड टच व नजरचुकीने किंवा अनावधानाने झालेला स्पर्श यातील फरक समजून घ्यावा. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची डॉ. उपासनी यांनी उत्तरे देऊन शंका समाधान केले.

         किशोरवयीन मुला मुलींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर, प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे, डॉ मुकेश पाटील व पूनम गुजराथी, इनरव्हील क्लब चोपडा अध्यक्षा सौ.डॉ. वैशाली सौंदाणकर, सरोज पाटील, कलप्ना महाजन, सुप्रिया कचरे, अनिल बाविस्कर आणि समाजकार्य महाविद्यालयातील प्रा डॉ रायपूर, प्रा. वळवी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षक - शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...