Sunday 25 August 2024

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना वसई तालुका गौरव २०२४ पुरस्कार प्रदान.....

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना वसई तालुका गौरव २०२४ पुरस्कार प्रदान.....

मुंबई, प्रतिनिधी :- समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनेल चा वर्धापनदिन निमित्त उत्कृष्ठ समाजसेविका म्हणुन वसई तालुका गौरव २०२४ पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.

एक महिला आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर खूप काही करु शकते हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे रूचिता नाईक आहेत. आपल्या विचारांतून  एक समाजसेवेची ज्योत प्रोज्योलित करुन आज ही ती अखंड पणे सुरुच ठेवली आहे.
हजारो महिलांना मोफत शिवणकाम, मेहंदी, ब्युटी पार्लर, केक मेकींग प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आले.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे मोफत २००० फॉर्म महिलांना वाटप करण्यात आले. शेकडो दिव्यांग बांधवांना मोफत दिव्यांग प्रमाणपत्र, साहित्य व पेन्शन मिळवुन दिली.
संजय गांधी योजने मधुन विधवा महिलांना दर महिना पेन्शन सुरू करून दिली. तहसिलदार येथुन गरीब गरजू नागरीकांना मोफत दाखले उपलब्ध करून देण्यात आले. शेकडो नागरीकांचे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करून देण्यात आली.
शिवसेना कार्यालयात दर महिन्याला आधार कार्ड शिबीर, आरोग्य शिबीर, मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, मोफत आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड नागरीकांचे शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले.

महिलांवरील अत्याचार थांबावे यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आदेश काढले. समेळगाव स्मशानभूमीतील लाकडे ठेवण्यासाठी शेडचे काम केले. सोपारा सामान्य रुग्णालयातील रिक्त जागे वरील भरती व साहित्य हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दिले. नालासोपारात दरवर्षी पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या नागरीकांना शासना कडुन मदत मिळवुन दिली.

पाणी समस्या, अनधिकृत बांधकाम, नैसर्गिक नाले, रस्त्यावरील खड्डे अनधिकृत मोबाईल टॉवर, अशा अनेक समस्या शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांनी मार्गी लावले. यासाठी आमरण उपोषण हि केले होते. बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रभावी कामगिरी करत असून, समाजकार्य व राजकारणात जास्तीत जास्त महिला सक्रियपणे सहभागी झाल्यास महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केले

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केलेल्या भरीव कामगिरीची टॉप टेन महाराष्ट्र न्युज चॅनेल ने दखल घेत त्यांना वसई तालुका गौरव २०२४ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी टॉप टेन महाराष्ट्र न्युज चॅनेलचे सर्वेसर्वा दिपक कोटेकर यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील, प्रहार संघटनेचे हितेश पाटील, मा.महापौर रूपेश जाधव, मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...