Monday 12 August 2024

महानगर सफाई कामगार संघाचा कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यालयावर मोर्चा !!

महानगर सफाई कामगार संघाचा कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यालयावर मोर्चा !!


कल्याण, प्रतिनिधी : महानगर सफाई कर्मचारी संघाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांतील जवळपास ३०० कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी कल्याण येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे अभिवादन करून महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना शहरप्रमुख (महानगर सफाई कामगार संघाचे कार्याध्यक्ष) महेश गायकवाड यांनी केले.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमधील सफाई कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केडीएमसीच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी केडीएमसीमधील २७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांनी महानगर सफाई कर्मचारी संघासह शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.१२) काम बंद करून धरणे आंदोलन केले. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास महापालिका अधिकाऱ्यांना घराबाहेर पडू देणार नाही, तसेच महापालिकेच्या कार्यालयांना टाळे ठोकू, असा प्रशासनाला इशारा दिला. 


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेलगतची २७ गावे १ जून २०१५ रोजी महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. या गावांतील ग्रामपंचायतीच्या वास्तू देखील महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. मात्र, अद्यापही ग्रामपंचायतमधील कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहे. २७ गावांतील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या नऊ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्यापही या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेतले नाही. किमान वेतन दिले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केला.


शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी २७ गावांतील कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कायमस्वरूपी समाविष्ट करण्याची मागणी केली. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला महापालिका सेवेत सामावून घ्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या केल्या. तसेच मागण्या मान्य न झाल्यास महापालिका अधिकाऱ्यांना घराबाहेर पडून देणार नाही. महापालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...