Friday 30 August 2024

मासूम संस्था व मॉर्गन स्टॅनली यांच्याकडून संत ज्ञानेश्वर नाईट शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश (ड्रेस) !!!

मासूम संस्था व मॉर्गन स्टॅनली  यांच्याकडून संत ज्ञानेश्वर नाईट  शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश (ड्रेस कोड) !!!
मुंबई प्रतिनिधी- विश्वनाथ राऊत तारीख -31, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम येथील रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना 26 ऑगस्ट 2024 रोजी मासूम संस्था व मॉर्गन स्टॅनली यांच्याकडून गणवेश वाटप करण्यात आले.  त्यावेळी स्वतः मासूम संस्थेचे एसएससी डिपार्टमेंटचे प्रमुख श्री शशिकांत गवस सर तसेच मॉर्गन स्टॅनलीच्या प्रतिनिधी प्रीती लाड मॅडम, मासूमच्या प्रोजेक्ट हेड सायली मॅडम उपस्थित राहून त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. ड्रेस मध्ये त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन टी-शर्ट देण्यात आले या टि - शर्टवर समोरील बाजूस मासूम संस्थेचा लोगो व पाठीमागच्या बाजूस शाळेचे नाव संस्थेचा लोगो व संस्थेचे नाव याची छपाई करण्यात आली आहे. ड्रेसचे वाटप करताच विद्यार्थ्यांनी तो टी-शर्ट परिधान करून आनंद व्यक्त करत ड्रेस मिळवून देणाऱ्या संस्थांचे विद्यार्थ्यांनी व शाळेने आभार मानले. 
रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश (ड्रेस) नसल्यामुळे कोणत्याही गणवेशात विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहायचे रात्र शाळा ही दिवसाच्या शाळेप्रमाणे वाटावी व  रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण शिस्तबद्ध रात्र शाळेत शिकत आहोत. याचा आनंद त्यांना मिळावा या उद्देशाने ड्रेस कोड रात्री शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
तसेच श्री राजेश सावंत  यांच्या प्रयत्नातून वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्याकडून 30 डझन वह्या रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या त्याबद्दल गणवेश व वह्या वाटप देणाऱ्या संस्थेचे शाळेच्या मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले.
त्याचबरोबर रात्र शाळा ही एक गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे आतापर्यंत राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते.
मागच्या पाच वर्षापासून एसएससी बोर्ड परीक्षेचा  निकाल 100% लावण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये येणारा विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन एसएससी परीक्षा पास होऊन, पास झाल्याचा दाखला घेऊन पुढील वाटचालीसाठी बाहेर पडावा असाच उद्देश रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत तसेच शिक्षक वर्ग श्री  समाधान खैरनार सर, वीरकर सर व सेवक पदी काम करणारे श्री प्रमोद गीते  यांनी ठेवला आहे. 
संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल ही मराठी माध्यमाची रात्र शाळा बैल बाजार कुर्ला पश्चिम या ठिकाणी नावारूपाला आली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, अशा 8वी 9वी व 10वीचे वर्ग असलेल्या रात्रशाळेत आपण प्रवेश घेऊन आपलं भवितव्य उज्वल करावं असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...