Tuesday 17 September 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी मोफत सोलार युनिट ची डोंबिवली येथे सुरुवात !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी मोफत सोलार युनिट ची डोंबिवली येथे सुरुवात !


डोंबिवली, सचिन बुटाला : डोंबिवलीमध्ये झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना देण्यात आलेल्या मोफत सोलर पॉवर युनिट कार्यक्रमाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ह्यांनी आज डोंबिवलीतील स्नेह रेसिडेन्सी येथून सुरुवात केली. कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा स्त्रोत योजनेचा प्रसार करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर युनिट उपलब्ध देण्याचा प्रयत्न चालवला आहे. डोंबिवली शहरातील दोनशेहून अधिक सोसायट्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत. यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांना विजबिलातून सुटका मिळणार आहे. असून या इमारतींना लिफ्ट, पथदिवे, सामूहिक विजपुरवठा, पाण्याचा पंप यासाठी लागणाऱ्या विजेसाठी दरमहा ५० ते ६० हजार रुपयाचे बिल भरावे लागते. या इमारतीची या वीज खर्चातून सुटका करता यावी किंवा किमान वीज बिल निम्म्यापर्यत कमी करता यावे यासाठी शहरातील अशा सर्व इमारतीवर सोलर प्रणाली कार्यान्वित करत केंद्र सरकारचा सौर उर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून डोंबिवली शहर पहिली ग्रीन सिटी करण्याचा आपला मानस असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.


या उपक्रमाचे उद्घाटन करताना आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावागावाचे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत आहे. यामुळे या गावांना प्रथमच चांगल्या रस्त्यावरून प्रवास करणे शक्य झाले आहे. असे नमूद करतानाच स्वातंत्र्यानंतर प्रथमच दोन वर्षांच्या काळात ९२ हजार कोटींची विकास कामे आपल्या खात्याच्या माध्यमातून करण्यात आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितलं. 


यावेळी स्नेह रेसिडेन्सीचे रहिवासी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, नगरसेवक साई शेलार व कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री रविंद्र चव्हाण यांचे स्नेह रेसिडेन्सी तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.


No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...