Tuesday 17 September 2024

गणेशोत्सव सणात जपली माणुसकी ; देणवाडीतील युवकांचा प्रेरणादायी उपक्रम !

गणेशोत्सव सणात जपली माणुसकी ; देणवाडीतील युवकांचा प्रेरणादायी उपक्रम !

कोकण - ( दिपक कारकर )

प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात,कधी-कधी ती आकस्मिक असतात, काहीजण त्यांचा संघर्ष करतात तर काही यापुढे हतबल होताना दिसतात. अशा प्रसंगी केवळ सामाजिक हिताची भावना जोपसाणारी माणसे, संस्था पाठीशी उभी राहतात. असाच एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे देणवाडी येथील श्री देणेश्वर जय हनुमान नवतरुण विकास मंडळ ( ग्रामीण - मुंबई ) व जय हनुमान क्रिकेट संघ ( देणवाडी ) यांनी हाती घेतला. उपरोक्त मंडळाच्या सदस्यांनी नुकत्याच साजरा झालेल्या गणेशोत्सव सणात वाडीतील दोन दुःखद प्रसंगात असणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला. 

देणवाडी गावचे भूमिपुत्र दिपक गु.शिगवण ( वय वर्षे - ३८ ) यांना अपंगत्व आल्याने त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी व काही महिन्यांपूर्वीच मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या स्व.विनोद ता.मांडवकर ( वय वर्षे २६ ) यांच्या पत्नीस व लहान मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठी दोन्ही कुटुंबाला आर्थिक स्वरूपात मदत सुपूर्द केली. स्वतः साठी जगता - जगता दुसऱ्यासाठी जगण्याची भावना देणवाडीतील तरुण युवकांनी मनी रुजवत समाजाला आदर्श देणारा उपक्रम पार पाडला. दरम्यान वाडी प्रमुख सोमा निवाते ( गावकर ), मुंबई मंडळाचे अध्यक्ष- सुनिल निवाते, तसेच प्रकाश निवाते, अनिल निवाते, संदीप निवाते, सचिन निवाते, रमेश तांबडकर, रविंद्र शिगवण, महेश धामणे, संदीप निवाते, संजय शिगवण, दिलिप मांडवकर, अनिल मांडवकर, परशुराम दुर्गोळी, तानाजी शिगवण ,अमिर निवाते, अमित मांडवकर, नितिन मांडवकर, निलेश हुमणे, सुभाष शिगवण, मनीष धामणे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपक्रमाचे पंचक्रोशीतुन अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...