Monday 2 September 2024

बॉम्बे हॉस्पिटलच्या संचालकांच्या विरोधात बॉम्बे हॉस्पिटलच्या नर्सेस व कामगार यांचे निषेध आंदोलन !!

बॉम्बे हॉस्पिटलच्या संचालकांच्या विरोधात बॉम्बे हॉस्पिटलच्या नर्सेस व कामगार यांचे निषेध आंदोलन  !!

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
           
             मागील दोन दिवस बॉम्बे हॉस्पिटलच्या नर्सेस व कामगार  बॉम्बे हॉस्पिटल संचालकांच्या निषेधात हॉस्पिटलच्या आवारात बसले होते. त्यावेळी एका नर्सेस बरोबर एक गैर प्रसंग घडला आणि नर्सेस व कागारांच्या मनात हॉस्पिटल व्यवस्थापनेविरोधात उद्रेक झाला. शिवसेना प्रवक्ते व सचिव राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आमदार  किरण पावसकर यांना युनिटच्या वतीने सर्व प्रकार सांगण्यात आला. माननीय आमदार शिवसेना सचिव प्रवक्ता राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष माननीय श्री किरण पावस्कर साहेब बॉम्बे हॉस्पिटलला आले. हॉस्पिटलला आले असता त्यानी पहिल्यांदा जो त्या नर्सेस भगिनीबरोबर झालेल्या गैरप्रकाराची सर्व माहिती घेऊन बॉम्बे हॉस्पिटलच्या विरोध संतापलेल्या हजारो कामगार व नर्सेसच्या जमावाला शांत केले.भटकलेल्या जमावाला शांत करण्याकरीता तब्बल ४ तास श्री किरण पावसकर बॉम्बे हॉस्पिटल मध्ये थांबले होते. हे सर्व चालू असतांना हॉस्पिटलच्या संचालकांना काहीही फरक पडला नाही. हॉस्पिटलमध्ये त्या सर्वांचे वास्तव्य आहे. तरी देखील त्यानी या सर्व भयानक घटनेची साधी दखल सुद्धा घेतली नाही. सर्व संचालक जावून छान जेवण करुन शांत झोपी गेले. पण दोन दिवस रस्त्यावर झोपलेल्या नर्सेस आणि कामगाराची त्यांनी कोणतीही माहिती किंवा भेट घेतली नाही ही शोकांतिका आहे. 

पण मा. आमदार शिवसेना सचिव प्रवक्ता, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री किरण पावसकर पावसकर साहेबांनी येऊन सर्वांना शांत करुन झालेल्या सर्व प्रकारची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री/ गृहमंत्री मा.श्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी स्वतः घेतली. त्यानंतर आझाद मैदान पोलिस स्टेशनला त्या मुलीची तक्रार नोंद करुन घेण्यात आली. याचा सखोल  तपास होईल असे सर्व कामगारांना ग्वाही मा. आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री किरण पावसकर साहेबांनी दिली.या बॉम्बे हॉस्पिटल व्यवस्थापनेचा हलगर्जीपणा व्यवस्थापनेला चांगलाच भोवणार आहे असे ही मा. आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री किरण पावसकर साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले. तसेच बाकीच्या मागण्यासाठी सोमवारी पावसकर साहेब व्यवस्थापना बरोबर तातडीची बैठक घेण्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलला येऊन पुढील माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...