Sunday 1 September 2024

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती, चर्चा सत्र संपन्न !!

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती, चर्चा सत्र संपन्न !!

डोंबिवली, सचिन बुटाला : महाराष्ट्र शासन अंगीकृत अमृत संस्था ही खुल्या प्रवर्गातील ज्यांना कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळत नाही अशा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी व उद्योजक यांच्या साठी स्थापन करण्यात आली आहे. डोंबिवली सर्वेश हॉल येथे महाराष्ट्र शासन अंगीकृत अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थी व उद्योजक यांनी त्याचा लाभ घ्यावा व स्वतःला सक्षम करावे यासाठी आखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या चर्चा सत्र आयोजित केले होते.

या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर व पदाधिकारी यांनी स्वागताध्यक्ष मा. निखिल लातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

अमृत संस्था व तिच्या योजना या संबंधित अमृत संस्थेचे अधिकृत ध्रुव ॲकडमी चे संचालक विजय देशपांडे यांनी माहिती सांगितली. यात 

अमृत द्वारा द्वा संचलित खालील उपक्रम -
*लघुउद्योग निर्मिती,
*विद्यार्थी शिष्यवृत्ती अनुदान
*स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य
*स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग 
*कृषी उत्पन्न आधारित उद्योग आणि प्रशिक्षण 
*वैयक्तिक कर्ज व्याज परतावा.
*परशुराम गट कर्ज व्याज परतावा योजना<
*तांत्रिक रोजगार क्षम प्रशिक्षण 
*उद्योग इनक्युबॅशन सेंटर 
*C-DAC ही माहिती आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण

किशोर विकास उपक्रम
*लघु उद्योगांना 15 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज*

अशा आणि इतर अनेक फायदे अमृत संस्थेचे आहेत त्याचा लाभ समाजातील लोकांनी घ्यावा असे आवाहन केले. या वेळी उपस्थित डोंबिवली नागरिक सहकारी बँक व बॅंक ऑफ इंडिया यांचे‌ अधिकारी यांनी उपस्थित राहून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी *पितांबरी समूहाचे माननीय श्री रवींद्र प्रभू देसाई* *अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री विजय जोशी* हे तसेच या कार्यक्रम करिता *माननीय सुशील कुलकर्णी, बाजीराव धर्माधिकारी, मकरंद कुलकर्णी तसेच माननीय भाऊ तोरसेकर यांची उपस्थिती विशेष होती*. याप्रसंगी फ्रेंड्स लायब्ररीचे पै, मा. नगरसेवक दीपेश म्हात्रे व महेश पाटील हे मान्यवर उपस्थित होते. 

दीपेश म्हात्रे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला एक ऑफिस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी डोंबिवलीतील राजकीय नेते, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व शहरातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क __
जिल्हा अध्यक्ष शशांक खेर - +91 72085 19251



No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...