Monday 23 September 2024

संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न !!

संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न !!

गंगाधाम, मार्केटयार्ड  22 सप्टेंबर २०२४ : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने देशभरात महिला संत समागमांचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेत पुणे झोन गंगाधाम स्थित निरंकारी सत्संग भवनात भव्य महिला संत समागम आयोजित करण्यात आला होता.या संत समागमात पुणे झोनमधील मिशनच्या सर्व शाखांतील हजारो महिला उपस्थित होत्या.

सत्संगाच्या मुख्य मंचावरून संबोधित करताना भगिनी सरबजीत शौक जी (मुंबई) म्हणाल्या की, केवळ भगवंताचे दर्शनच आनंददायी आहे. या निरंकार परमात्म्याचे आपल्या सद्गुरूंकडून दर्शन घेतलेल्या भक्ताची एक असीम, आनंदमय अवस्था, हा प्रत्येक ब्रह्मज्ञानी व्यक्ती चा वेगळा अनुभव पाहायला मिळतो. देवाचे दर्शन झाल्यावर तो आनंदाने नाचू लागल्याचे पाहायला मिळते. 

त्यांनी पुढे समजावले कि, गृहस्थ जीवन जगताना भक्तीमार्गावर चालावे.आपल्या गृहस्थी जबाबदाऱ्या पार पाडताना भक्तीही करावी लागते. जिथे संपूर्ण कुटुंब मिळून निरंकार परमात्म्याचे स्मरण करते, त्या घरात सदोदित आनंद असतो. ब्रह्मज्ञानानेच आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्या मध्ये ईश्वराचे दर्शन करू शकतो आणि त्यातूनच आपले परस्पर प्रेम वाढते. जेव्हा आपल्या जीवनात प्रेमाची भावना येते तेव्हा ते जीवन सहज सोपे होते आणि ही अवस्था या परमपिता निरंकाराशी जोडल्यानेच शक्य होते. शेवटी त्या म्हणाल्या की देवाच्या मर्जीमध्ये जगताना प्रत्येक क्षणी त्याचे आभार मानले पाहिजेत. अशा भावनेनेच भक्तीने परिपूर्ण जीवन जगता येते.
या महिला संत समागमात वक्त्यांनी प्रेम, दया, सहिष्णुता, श्रद्धा, करुणा आणि एकता या मूल्यांवर आपले विचार, गीते, नाटिका, भक्ती रचना आदींद्वारे प्रकाश टाकला. महिला सत्संग इन्चार्ज सुलभा काबुगडे आणि पुष्पा करमचंदानी यांनी प्रमुख अतिथी सरबजीत शौक जी यांचे स्वागत केले.झोनल प्रभारी श्री ताराचंद करमचंदानी यांनी पुणे झोन मधून आलेल्या सर्व शाखांच्या संतांचे आणि महिला संत समागमातील व्यवस्थेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सेवादारांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...