Monday 30 September 2024

*"वारी चुको ने दि हरि तपपूर्ती" भव्य नामयज्ञ सोहळा संपन्न !!

*"वारी चुको ने दि हरि तपपूर्ती" भव्य नामयज्ञ सोहळा संपन्न !!

नालासोपारा नगरी अवघी झाली भक्तीमय.....

मुंबई  - ( दिपक कारकर ) :

महाराष्ट्राला फार मोठी संत  परंपरा लाभली असून ती अखंडितपणे प्रवाहित आहे, "विठोबाचा धर्म जागो! त्याचे चरणी लक्ष लागो!" अशा संत परंपरेतील "वारी चुको ने दी हरि" या मंडळाचे वारीचे तप पुर्ण झाल्या निमित्ताने दि.२८ व २९ सप्टेंबर २०२४ रोजी नालासोपारा येथे दोन दिवसीय नामयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी गणेश पुजन, विठ्ठल रुक्मिणी, जगद्गुरु तुकाराम महाराज व माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिमा पुजन, कलश स्थापना, विणा पुजन व दिपप्रज्वलन, करून अखंड नामयज्ञाला सुरूवात करण्यात आली, तद्नंतर सोहळ्याचे व्यासपीठ चालक ह.भ.प. योगेश बेर्डे यांनी पंचपदी केली त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पारायण झाले. त्याचबरोबर पांडुरंग हरि भजन मंडळ यांचे श्रीमद् नारायण असे नामस्मरण, ह. भ. प.राजेंद्र महाराज तावडे यांचे प्रवचन सेवा संपन्न झाली. तदनंतर भव्य दिव्य असा हरिपाठ व सायंकाळी ह. भ. प. श्री मनोहर महाराज लांडे यांचे कीर्तन संपन्न झाले, दुसऱ्या दिवशी रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० ते १२ वाजेपर्यंत वारकरी रत्न ह.भ.प. शंकर मोरे नाना यांचे काल्याचे कीर्तन झाले, या दोन्ही कीर्तन साथीला श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय अचोळे, ह.भ.प. गायनाचार्य गोपाळ कुटे, सदानंद गायकवाड राजेंद्र महाराज तावडे, यदू बुवा, योगेश बेर्डे अरूण राणे अनंत शेणॉय तसेच मृदुंगमणी ह.भ.प. नितीन भंडारी, व ह.भ.प. संदीप जाधव यांनी साथ केली.

सदर सोहळ्यास श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शिवाजी पाटील, श्री विनोद चव्हाण,जयराम पवार माऊली जनार्दन धयाळकर, ह.भ.प.शंकर माळी, जनार्दन शिंदे, प्रनव लांबाडे, चंद्रकांत गुरव, शिवाजी भानत, सुधाकर बाईत आदी  मान्यवर उपस्थित होते. हरीजागर- ह.भ.प. नितेश अंबेकर, प्रतिक माऊली व ईतर मंडळी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होती. ह्या भव्य दिव्य अशा सोहळ्याला राजकीय नेते मंडळी, स्वराज्य अभियान संस्थापक अध्यक्ष धनंजय गावडे, नगरसेवक निलेश देशमुख व इतर  मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण सोहळ्याची धुरा अनंत शेणॉय, ह.भ.प.योगेश बेर्डे माऊली, अरूण राणे माऊली, आकाश भनगे, अरविंद मोरे, राहुल जाधव, श्रीकांत वेदक, व संपूर्ण "वारी चुको ने दी हरी" समुह मधील सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. ह्या स्तुत्य अशा नियोजनबद्ध भक्तिमय सोहळ्याचे अनेक स्तरातुन कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment