Monday, 30 September 2024

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा संपन्न !!

** कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ इंदुमती जाखर यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती 

कल्याण, सचिन बुटाला : महाराष्ट्र चेंबर ऑफ हैसिंग इंडस्ट्रीज कल्याण डोंबिवली युनिटची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा दि २७-०९-२०२४ रोजी पार पडली. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त मा. डॉ इंदुमती जाखर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. 

या समारंभात एम.सी.एच. आय कल्याण डोंबिवली युनिट चे मावळते अध्यक्ष श्री. भरत छेडा (हॅप्पी होम) यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. राजेश गुप्ता (महावीर इन्फ्रास्ट्रक्चर) यांच्या हाती सूत्रे दिली. श्री. सुनिल चव्हाण (हाऊस ऑफ चव्हाण) यांची सचिव पदावर नियुक्ती केली. संयुक्त सचिव श्री. साकेत तिवारी (साकेत ग्रुप) आणि श्री. राहुल कदम (मैत्री ग्रुप) यांची खजिनदार म्हणून नियुक्ती केली गेली. मावळते अध्यक्ष श्री. भरत छेडा यांनी त्यांच्या कारकिर्दीतील कामाचा आढावा घेतला. शहर सौंदर्यकरण अंतर्गत कल्याण डोंबिवली शहरातील २५ रस्ते दुभाजक संस्थेचे सभासद १० ते १२ वर्ष पालिकेच्या देखरेखीखाली करीत आहे. पालिकेच्या सर्व उपक्रमाला एम.सी.एच. आय कल्याण डोंबिवली युनिट हातभार लावत आलेला आहे. 

माननीय. श्री. रवी पाटील यांनी संघटनेतील सर्व सभासदांना बांधकाम करताना पर्यावरणाच्या समतोल कसा राखावा. यावर मार्गदर्शन केले. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. राजेश गुप्ता यांनी अध्यक्षीय भाषणात बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगून सभासदांनी निःसंकोचपणे आपल्या अडचणी सांगण्यात एम.सी.एच. आय युनिट त्या सोडवण्यास कटिबंध आहे असे आश्वासन दिले. अल्ट्राटेक कंपनीतर्फे इमारत बांधकाम साहित्याचे प्रदर्शन आणि माहितीचे प्रदर्शित करण्यात आली.

समारंभाची सांगता सहसचिव श्री. साकेत तिवारी यांनी सर्व सभासदांचे आणि उपस्थितांचे आभार मानून केले.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...