Sunday, 29 September 2024

वर्ल्ड वाईड (जागतिक मानवाधिकार) ह्यूमनराइट्स ए.एफ.या संघटनेतर्फे कु.जेष्ठा शशांक पवार चा सत्कार !

वर्ल्ड वाईड (जागतिक मानवाधिकार) ह्यूमनराइट्स ए.एफ.या संघटनेतर्फे  कु.जेष्ठा शशांक पवार चा सत्कार !

११ देशांच्या इंडोरन्स वर्ल्ड फेडरेशन इंटरनॅशनल चॅम्पियन्सशिप स्पर्धेत ३ सुवर्णपदकाची जेष्ठा ठरली मानकरी 
 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           वर्ल्ड वाईड (जागतिक मानवाधिकार) ह्यूमनराइट्स ए.एफ.या संघटनेच्यावतीने वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ. चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.अविनाश जी सकुंडे यांच्या आदेशानुसार शनिवार  दि.२९/९/२०२४ रोजी WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्यावतीने लोवर परळ मुंबई येथील सामान्य कुटुंबातील कु. जेष्ठा शशांक पवार (वय ६ वर्ष) स्केटिंग या खेळात थायलंड येथे संपन्न झालेल्या ११ देशांच्या इंडोरन्स वर्ल्ड फेडरेशन इंटरनॅशनल चॅम्पियन्सशिप स्पर्धेत ३ सुवर्णपदक मिळवून तिने भारताकडून झालेली तिची निवड सार्थ ठरविली. स्केटिंग स्पर्धेच्या ०.२०, १.०, २.० मिनिट अशा तिन्ही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करून भारताला ३ सुवर्णपदके मिळवून दिली व भारत देशाची शान राखली. त्याबद्दल संघटनेकडून तिचा शाल, पुष्पगुच्छ व खाऊचा डबा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठाचे आई वडील श्री व सौ.शशांक पवार, WHRAF चे महाराष्ट्र सचिव सौ.ज्योती ताई भोसले, मुंबई महासचिव सौ.प्रमिला अडसूळ, मुंबई सचिव श्री.महेश आंब्रे, श्री. नंदकुमार बागवे, श्री.साई गोपाळ चील्का, अध्यक्ष मीरा भाईंदर श्री. स्टिव्हन कार्डोझा, मीरा भाईंदर युवासेनेचे श्री. मोरेश्वर कुंडले, हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचे मुंबई सचिव श्री. लितेश केरकर, श्री. प्रदीप अडसूळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल !

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल ! मुंबई, प्रतिनिधी :-  उन्हाळी सुट्टीला सुरुवात होताच अनेकजण आपला परिवार किंवा मित्रमंडळासह...