Tuesday 15 October 2024

कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन !!

कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन !!


कल्याण, सचिन बुटाला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन आज (15 ऑक्टोबर) करण्यात आलं. कार्य अहवाल जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशित केला.यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की आमदार म्हणून निवडून आल्यानंतरची सुरुवातीची अडीच वर्षे ही कोवीडशी लढण्यातच गेली. मात्र त्याकाळातही कोवीड रुग्णालय असो, ऑक्सिजन प्लांट असो, इतर वैद्यकीय साधन सामुग्री असो या सर्वांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला. तर कोवीडनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मग खऱ्या अर्थाने कल्याण पश्चिमे कडील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमएसआरडीसी अशा विभागांतील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे सुरू असल्याची माहिती दिली तसेच आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांसह केडीएमसीला स्वतंत्र धरण असावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.


यावेळी आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक संजय पाटील, शिवसेना महिला पदाधिकारी विजया पोटे, छाया वाघमारे, नेत्रा उगले इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा कल्याण पश्चिम या मतदारसंघावर दावा केला. तसेच याबाबत बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सावध पवित्र घेतला. तर शिवसेना शिंदे गटाकडून देखील अनेक इच्छुक असल्याचे प्रश्नाला उत्तर देताना भोईर यांनी इच्छुक असणं गैर नाही इच्छुक असणे, म्हणजे त्या पक्षाचा चढता आलेख आहे. महायुती जो उमेदवार देईल एकनाथ शिंदेचे आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी ! भिवंडी, दिं,१६,अरुण पाटील ...