Tuesday, 22 October 2024

भिवंडी ग्रामीण विधानसभा समन्वयक पदी जयेश शेलार यांची नियुक्ती !!

भिवंडी ग्रामीण विधानसभा समन्वयक पदी जयेश शेलार यांची नियुक्ती !!

भिवंडी, सचिन बुटाला : सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून महायुती व महाविकास आघाडी यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी ग्रामीण विधानसभा महायुतीकडून समन्वयक नियुक्त करण्यात आले असून भाजपाकडून जितेंद्र डाकी, शिवसेना (शिंदे) यांच्याकडून देवानंद थळे तर राष्ट्रवादी (अजितदादा) कडून जयेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

महायुतीतील भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून या विधानसभेतील प्रचाराची पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वयकांना महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. 

दरम्यान भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भाग व वाडा तालुक्यातील काही भागाचा समावेश असून या विधानसभेसाठी महायुती व महाविकास आघाडी यांच्याकडून कोण उमेदवार दिले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...