Friday 11 October 2024

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !!

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !!

झालेली कारवाई सूडबुद्धीने - माजी नगरसेवक विजय (अप्पा) काटकर

मोहने, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दया शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने हजारो शिवसैनिक संतप्त झाले असून या सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध करीत आहेत. 

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदार खासदार नगरसेवक शिवसेना सोडून गेले होते. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी इमान राखून ठाकरे गटात राहण्याचा धाडसी निर्णय दया शेट्टी यांनी घेतला होता. कोणत्याही दबावाला अथवा राजकीय षडयंत्राला शरण येत नसल्याने पाहून त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला परंतु शेट्टी हे कोणत्याही दबावाला बळी पडत नसल्याचे पाहून विरोधक नेहमी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांना अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीत होते.

काही दिवसांपूर्वी मोहने बुद्ध विहार समोरील एका इमारतीमध्ये त्यांनी आपले कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार कार्यालयाचे कामही अंतिम टप्प्यात आले होते. 
कार्यालयाचे उद्घाटन झाल्यास शेट्टी हे स्वतः आर्थिक संपन्न, उद्योगपती असल्याने आपल्या कार्यालयामार्फत नागरिकांची अनेक प्रकारची कामे करतील त्यांच्या समस्या सोडवतील अनेक शिबिरे लावतील आणि उपस्थित जनसमुदाय आपल्याकडे खेचून घेतील आगामी  विधानसभेची निवडणूक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आपल्याला जड जाईल या भीतीने विरोधक वेगवेगळे षडयंत्र आखात होते. विविध मार्गाने दया शेट्टी कसे अडचणीत येतील यासाठी प्रयत्न करीत होते परंतु दया शेट्टी यांनी कोणत्याही षडयंत्रास बळी न पडता आपले समाजसेवेचे काम सातत्याने सुरू ठेवले होते.

अनेक मित्र मंडळांना त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे बाल गोपाळ मित्र मंडळ असो गणपती मंडळ असो नवरात्र मंडळ असो अशा अनेक मंडळांना त्यांनी भरघोस आर्थिक मदत केलेली आहे अनेक मंडळे त्यांनी आपल्याकडे आकर्षित केले आहेत याचा धसका घेऊन विरोधकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक यांच्यावर दबाव आणून त्यांच्या कार्यालयाबाहेरील शेड सूडबुद्धीने तोडण्यास लावण्याचा आरोप माजी नगरसेवक विजय आप्पा काटकर यांनी केला आहे.

कार्यालयाबाहेरील शेड तुटताच शेकडो कट्टर शिवसैनिकांनी तात्काळ दया शेट्टी यांना संपर्क करून तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा कारवाईला आम्ही घाबरत नसून हिम्मत असेल तर समोरून वार करा पाठीमागे तर कोणीही वार करतो अशी भावना व्यक्त केली.

शेकडो शिवसमर्थक शिवसैनिकांनी शेट्टी यांना फोन करून कार्यालयात झालेल्या तोडफोडे विषयी विचारले तसेच लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कासीत करण्यासाठी आयुक्तांची भेट येणार असल्याचे विभाग प्रमुख सुरेश सोनार यांनी सांगितले.

या कारवाईबाबत दया शेट्टी यांना विचारले असता __
माझ्या कार्यालयाबाहेर असलेले शेड हे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना ऊन्हा पावसापासून संरक्षण करण्याकरिता टाकले होते वाहतुकीकरिता याचा कोणत्याही प्रकारचा अडथळा नव्हता तसेच हे शेड रस्त्यापासून दहा ते पंधरा फूट मागे होते तरीही सूडबुद्धीने माझ्या कार्यालयाबाहेरील शेड वर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत आपण आयुक्तांची भेट घेणार असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कर्षित करण्याची मागणी करणार आहे. 
यापूर्वी देखील माझ्यावर अनेक वेळा दबाव आला असून अशा दबावाला मी बळी पडणार नसून माझे शिवसेना पक्षाचे कार्य व समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवणार आहे हजारो नागरिकांनी जो मला प्रत्यक्ष फोन करून भेटून पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे धन्यवाद व्यक्त करतो. 

दया शेट्टी यांच्या कार्याला बाहेरील शेड वर कारवाई सूडबुद्धीने झाली असून याचा सर्व स्तरातून निषेध होत असून याचा आगामी निवडणुकीत विरोधकांना मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !!

माजी नगरसेवक शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संतप्त !! झालेली कारवाई सूडबुद्धीने - माजी नगरसेवक व...