Saturday, 2 November 2024

ज्येष्ठ साहित्यिक कोकण सुपुत्र अशोक लोटणकर यांना आशीर्वाद पुरस्कार जाहीर !

ज्येष्ठ साहित्यिक कोकण सुपुत्र अशोक लोटणकर यांना आशीर्वाद पुरस्कार जाहीर !

मुंबई (शांताराम गुडेकर) :

            रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा गावचे मूळ रहिवाशी, मुलुंड मुंबई येथे वास्तव्यास असलेले  ज्येष्ठ साहित्यिक, कवी अशोक लोटणकर यांच्या पाठीवरचा चंद्र या ललित गद्य संग्रहास वंदना प्रकाशन, मुंबईचा रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार जाहीर झाला आहे.
             लोटणकर यांची विविध साहित्य प्रकारातील एकूण २१ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात अंध मुलांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके देखील आहेत. अरिहंत पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला प्राप्त झालेला हा चौथा पुरस्कार आहे. एकूण २४० पुस्तकातून या पुस्तकाची निवड झालेली आहे. लोटणकर यांच्या विविध साहित्य कृतींना ३०हून अधिक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.३० नोव्हेंबर रोजी मुंबईत दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॕ.भालचंद्र मुणगेकर, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॕ. रवींद्र शोभणे आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक राजीव श्रीखंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गावचे सुपुत्र लोटणकर यांना हा पुरस्कार जाहीर  झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, ग्रामीण मंडळ, विविध संस्था,प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे  अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

मोहने गाळेगाव विभागात दोन दिवसात तीन बलात्काराच्या घटना !!

मोहने गाळेगाव विभागात दोन दिवसात तीन बलात्काराच्या घटना !!  *कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण** संदीप शेंडगे. *मोहने गाळे...