घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?
** घाटकोपर पश्चिम मध्ये बदल मी घडवणार - संजय भालेराव
घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभेचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय भालेराव यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन अमृत नगर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी उमदेवार संजय भालेराव यांनी घाटकोपर पश्चिमच्या समस्यांचा पाढाच मतदारांना समोर वाचला. २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण अपक्ष उभे राहून आपल्याला ४२ हजार मत मिळाली होती, तर आता आपल्या सोबत आता संपूर्ण महाविकास आघाडी आहे तर यावेळी आपण ८० हजार मतांचा आकडा पार करणार असल्याचा विश्वास त्यांनी जाहीर सभेत मतदारांसमोर व्यक्त केला. सद्या गेली काही दोन तीन वर्ष मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक नसून प्रशासकराज्य आहे. या काळात नगरसेवक नसल्यामुळे प्रशासक यांच्याकडून मंजूर होणारा निधी हा तेथील स्थानिक आमदारांना मिळत आहे. फक्त या वर्षी मुंबई महानगरपालिकेकडून घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिमच्या विकास कामांसाठी दोन हजार एक कोटीचा निधी आला आहे. तसेच २०२६ कोटी रुपयाचा निधी म्हाडा कडून आला आहे. एकूण यावर्षी घाटकोपर पश्चिम मधील विकासकामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी पूर्ण पणे पास झाला आहे. मग हा मंजूर निधी गेला कुठे ? यामध्ये विकास कामे किती झाली. मी जर आमदार असतो आणि मला हा निधी भेटला असता तर मी आज या व्यासपीठावर नसतो घरी झोपलो असतो. आणि तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलं असत एवढी कामे मी या निधी मधून घाटकोपर पश्चिमसाठी केली असती. या विधानसभा क्षेत्रात जे आजी माजी नगरसेवक होते त्यांच्या फक्त कामांच्या पाट्या बदल्या गेल्यात आणि फक्त आता यांच्या पाट्या लागल्यात आणि त्यांच्या वर फक्त सुशोभीकरण केलं आणि निधी पास झालाय कामाच्या नावाने शून्य अशी टिका त्यांनी भाजपचे उमेदवार आमदार राम कदम यांच्यावर केली.यावेळी संजय भालेराव यांनी जाहीर सभेत बोलताना म्हटले की घाटकोपर पश्चिम मधील गावदेवी, आनंदनगर याठिकाणासाठी एसआरए प्रोजेक्ट आहे, रिझव्ह फ्लॉट आहे शाळेसाठी पण किती दिवस झाले आहेत पण हे काम रखडलेले आहे रामनगर, हनुमान नगर येथे गेली १८ वर्ष संक्रमण शिबिरामध्ये लोक राहत आहे, मागे मी मानखुर्द याठिकाणी पुनर्वसन झालेल्या ठिकाणी गेलो असता अजून पर्यंत त्यांना स्वतःची हक्काची घरे मिळालेली नाहीत, महिला रडत आहेत असे ते आपल्या भाषणात बोलले तसेच मागे दामोदर पार्क येथे साई सिध्दी बिल्डिंग पडली होती त्यामध्ये १७ लोक दगावली होती पण आज पर्यंत ती लोक बेघर आहेत. जेव्हा तिथे ही घटना घडली तेव्हा मोठे नेते येऊन गेले तरी आज पर्यंत त्याजागी त्या बिल्डिंगच पुनर्निर्माण झाले नाही त्याजागी आता गवत उगवले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आज पर्यंत घाटकोपर पश्चिम येथील डोंगराळ भागात तेच- तेच मुद्दे आहेत त्याच समस्या आहेत. पाणी प्रश्न, शौचालय प्रश्न जैसे तेच आहे मग निधी येतो कशासाठी मग मंजूर निधी जातो कुठे? घाटकोपर मध्ये यात्रा, साड्या वाटप हे आपल्याच पैसे मधून होत आहे. याठिकाणी खुले आम पैसे वाटप चालू आहे तेव्हा मी माझ्या कार्यकर्ते यानां संगितले स्थानिक संबंधित विभागाला तत्काळ फोन करून तक्रार करा असे बोलले असे ही संजय भालेराव बोलले. येथील माझ्या सोबत फिरणाऱ्या लोकांना फोन केला जातो, धमक्या दिल्या जात आहेत हिंमत असेल तर मला दम द्या मी उमेदवार आहे गोरगरीब जनतेला धमक्या का देता, जर कोण तुम्हाला धमकी देत असेल तर मला फोन करा त्यावेळी काय झाले तर पहिली केस मी घेईन एक नाही तर मी शंभर केस तुमच्यासाठी घेण्यासाठी तयार आहे असे ही ते आपल्या भाषणात बोलत कार्यकर्त्यांना विश्वास दिला आपल्याला घाटकोपर मध्ये बदल घडवावाच लागेल.मी मागे १० वर्ष नगरसेवक असताना जी कामे केली आहेत आणि आमदार राहिलेल्यांनी १५ वर्षात जी कामे केली आहेत हे त्यांनी घेऊन जाहिर माझ्यासोबत चर्चेला बसावं. मी घाटकोपरच्या देव्हाऱ्यात देव बसवला आहे याठिकाणी ग्रंथालय बांधलय हॉस्पिटलचे काम हाती घेतलय शाळेसाठी आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून सीबीएसई बोर्ड चालू करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे, कृत्रिम तलाव चालू केले आहे मी घाटकोपर पश्चिम मध्ये अनेक ठिकाणी स्वतः लक्ष घालून अनेक कामे चालू केली आहेत. पंधरा वर्ष घाटकोपर पश्चिम चे आमदार असून आणि मुख्यमंत्री तुमचा असून ही एक ही कामे झाली नाहीत असे ही त्यांनी आपल्या भाषणातून राम कदम यांना सवाल केला. यावेळी संजय भालेराव यांनी मतदारांसमोर महाविकास आघाडीची पंचसुत्री मांडली.
तरी घाटकोपर पश्चिमच्या विकासासाठी २० तारखेला मला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केले.
No comments:
Post a Comment