Monday, 11 November 2024

FSKA वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत गुहागर तालुक्यातील भातगांवकर ध्रुव निलेश हुमणेला सुवर्णपदक !!

FSKA वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत गुहागर तालुक्यातील भातगांवकर ध्रुव निलेश हुमणेला सुवर्णपदक !!

मुंबई - ( दिपक कारकर )

आताच्या संगणकीय युगात लहानपणीच संस्कारमय झालेली मुले देशाचं भवितव्य घडवणारी असतात.प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविधात्मक कलागुण भरगच्च भरलेले असतात.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं की, ते आपले कर्तृत्व निश्चित करतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील भातगाव मधील भूमिपुत्र असणाऱ्या निलेश हुमणे यांचे चिरंजीव ध्रुव निलेश हुमणे याने फार कमी वयात आपल्या शैक्षणिक क्षेत्रासोबत क्रिडा प्रकारात उत्तुंग यश मिळवले आहे.

ध्रुव हुमणे सद्यस्थित मुंबईत विरार येथे वास्तव्यास असून, सेंट जॉन २३Rd हायस्कुल, विरार येथे इयत्ता ६ वी. मध्ये शिकत आहे. कराटे खेळ प्रकारात प्रचंड आवड असणाऱ्या ध्रुवने आजवर अनेक तालुका, जिल्हा, राज्य ते देशांतर्गत स्पर्धेत सहभाग सहित प्राविण्य मिळवले आहे.

नुकतीच २४ वी FSKA वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप २०२४ ही स्पर्धा जगात प्रत्येक दोन वर्षांनी खेळवली जाते. सन २०२४ हा मान भारताला मिळाला असुन ही स्पर्धा ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ रोजी मापूसा, गोवा येथील पेड्डर स्टेडियम येथे पार पडली. ह्या स्पर्धेत जगातील २३ देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या ध्रुवने काथा मध्ये गोल्डन मेडलची कमाई केली.ध्रुवचे प्रशिक्षण कोच संतोष चौहान आणि सलमान सर यांचे सहकार्य मोलाचे लाभले.

ध्रुवने या अगोदर गुजरात, मुंबई, पालघर शहरांत कराटे खेळात गोल्ड आणि सिल्वर/मेडलची कमाई करत वयाच्या ५ वर्षापासून ध्रुव कराटे मध्ये खेळत असुन २ नंबर ब्राउन बेल्ट आहे. ध्रुवला शाळेतून सुद्धा विविध खेळात प्रोत्साहन दिले जाते. यापूर्वी चेस तसेच रुबीकुब मध्ये सुद्धा देशाचे प्रतिनिधित्व करून, ३×३ कुब ३२ सेकंद मध्ये सोडवून इंडिया बुक मध्ये १० वर्षे वयोगटात देशात प्रथम येण्याचा मान ध्रुवने प्राप्त केला. क्रिकेट हा त्याचा आवडता खेळ आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनीला प्रेरित होऊन विविध क्रिकेट स्पर्धेत आवर्स अकॅडमी नंतर अमेय गोल्डन अकॅडेमी कडुन लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा आपलं आणि शाळा जॉन २३Rd चे नाव उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ध्रुवच्या यशामागे कराटे खेळाचे कोच, शाळेचे प्राध्यापक / शिक्षक वृंद तसेच ध्रुवची आई नीहारिका व वडील निलेश हुमणे  यांचे अतुलनीय परिश्रम आहेत. ध्रुवच्या उत्तुंग यशाचे श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) व विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन !

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन ! मुंबई (शांत...