कोकण मराठी साहित्य परिषदच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती !
मुंबई (शांताराम गुडेकर) :
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याची कक्षा महाराष्ट्रभरात व्यापक होत आहे.ही बाब लक्षात घेऊन साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार, संशोधक, संघटक, चित्रपट नाट्य समीक्षक, सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १९९८-१९९९ ला मुंबई जिल्हा कार्यवाह म्हणून योगदान देणाऱ्या शीतल करदेकर यांची नियुक्ती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी करण्यात आली आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय कार्यवाह माधव अकलंगे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.या नियुक्तीबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ.मनोज वराडे तसेच केंद्रीय कार्याध्यक्ष डाॅ. प्रदीप ढवळ यांनी करदेकर यांचे अभिनंदन केले आहे. तर केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत. या जबाबदारीच्या पदाबद्दल भावना व्यक्त करताना शीतल करदेकर यांनी, मराठी भाषा व साहित्य समृध्दी, सक्षमीकरणासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment