Wednesday, 22 January 2025

प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून विविध विकास कामांचा झंझावात !

प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून विविध विकास कामांचा झंझावात !

** जी विकास कामे आजपर्यंत कोणीही करू शकले नाही ती विकास कामे डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ. सुबोध बावदाने यांनी पूर्ण करून दाखवली 

घाटकोपर, (केतन भोज) : विक्रोळी पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १२३ मध्ये माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व शिवसेना घाटकोपर पश्चिम विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून प्रभागातील अनेक प्रलंबित समस्या आणि विकासकामे महापालिका व इतर ठिकाणी पाठपुरावा करून तसेच काही इतर स्वखर्चातून सोडवल्या जात आहेत. यामध्ये १२३ प्रभागातील ज्या- ज्या विभागात समस्या असतील त्या ठिकाणी लादिकरण, मंडळाच्या शेडचे काम, नाले सफाई, सार्वजनिक शौचालयाचे काही प्रश्न असतील किंवा इतर अनेक प्रश्न पूर्ण करण्याचे काम त्यासोबतच प्रभाग क्रमांक १२३ मध्ये प्रत्येक विभागात, मंडळात मोफत आरोग्य शिबिरे विविध आजारांवरील शस्त्रक्रिया नागरिकांना मोफत करून देण्याचे काम याशिवाय विभागातील स्थानिक मुला - मुलींना नोकरी मिळवून देण्याचे काम डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून पूर्ण केले जात आहेत. 

त्यामूळे प्रभाग क्रमांक १२३ मधील सर्व स्थानिक नागरिकांकडून याविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत डॉ. भारती बावदाने यांना पूर्ण क्षमतेने पाठींबा देऊन यावेळी निवडून आणण्याचा निर्धार १२३ प्रभागातील सर्व नागरिकांनी केला आहे. तसेच शुभारंभ मित्र मंडळाचे खुले सभागृह ( शेड ) व लादीकरण करण्याचे काम तसेच सहकार मित्र मंडळाच्या शेड मध्ये लोखंडी जाळी, लोखंडी दरवाजा लावण्याचे काम माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व घाटकोपर पश्चिम विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या प्रयत्नाने पूर्ण करण्यात आले आहे, त्याबद्दल विभागीय जनतेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच जी विकास कामे आजपर्यंत कोणीही करू शकले नाही ती विकास कामे प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व शिवसेना घाटकोपर पश्चिम विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांनी करून दाखवली आहेत.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !!

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !! *कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने...