Wednesday, 22 January 2025

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

मुंबई, (केतन भोज) : तळा तालुका क्रिकेट असोसिएशन यांचा गुणगौरव सोहळा सन २०२३-२४ दादर श्री शिवाजी मंदिर येथे रविवार दि.१९ जानेवारी रोजी पार पडला. या गुणगौरव सोहळ्यात (मागील वर्षी सन २०२२/२३ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान) के.सी.सी.बॉईज बेलघर संघ तळा तालुक्यातील अधिकृत नोंदणीनुसार एकूण ९४ संघांमध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धेमधील अव्वल स्थानी उत्तुंग कामगिरी करणारा पहिला क्रमांक व शिस्तबध्द संघ असे एकाच वेळी दोन पारितोषिक पटकणारा संघ ठरला असून के.सी.सी.बॉईज बेलघर संघाचे खेळाडू प्रकाश गोळे, प्रणव कदम, यश आंबार्ले हे तळा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघातून खेळण्यास पात्र ठरले असून सर्वोत्कृष्ट फलंदाज दिनेश खुटिकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रयाग पाशिलकर, सर्वोत्तम ऑल राऊंडर भावेश कुऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. तसेच एकूण ९४ अधिकृत नोंदणी संघातून प्रथम क्रमांक के.सी.सी बॉईज संघ बेलघर, द्वितीय क्रमांक यंग बॉईज संघ रहाटाड (कोळीवाडा), तृतीय क्रमांक काळभैरव क्रिकेट संघ अडनाले, चतुर्थ क्रमांक नवहिंद क्रिकेट संघ पाचघर, पाचवा क्रमांक एम एस सी क्रिकेट संघ मांदाड हे पारितोषिक पटकाविण्यात एक ते पाच क्रमांकाचे मानकरी ठरले. या कार्यक्रम निमित्ताने तळा तालुका क्रिकेट असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, तळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक संघटनेतील पदाधिकारी, बेलघर/तळघर ग्रामस्थ, तळा तालुक्यातील बहुतांश क्रिकेट खेळाडू यांच्या व्यतिरिक्त अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. तळा तालुका क्रिकेट असोसिएशन संघटना ही सामाजिक बांधिलकी जपत सर्व धर्म समभाव अश्या प्रेरणेने विविध प्रकारे कार्यक्रम राबवित असते त्यातून हा एक क्रिकेट माध्यमातून गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी ! मुंबई, (केतन भोज) : तळा तालुका ...