उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात वंदे मातरम् सामूहिक गायनाचा स्तुत्य उपक्रम !
**सुमारे ४५०० विद्यार्थ्यांनी केले वंदे मातरम् चे समूहगायन
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
भारत मातेला वंदन करणारे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' १५० वर्षांपूर्वी कार्तिक शुद्ध नवमीला लिहिले गेले. ही तिथी कुष्माण्डा नवमी या नावेही ओळखली जाते. या तिथीला देवीने जसा कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला आणि देवतांना अभय दिले, त्याचप्रमाणे आपली भारत भूमी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली म्हणून तत्कालीन प्रख्यात कादंबरीकार आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे राष्ट्रीय गीत लिहिले. बालपणापासून आपण त्याचे एकच कडवे म्हणत आलो आहोत. मात्र चॅटर्जी यांनी त्याच काव्यात मातृभूमीच्या स्तुतीपर आणखी चार कडवी लिहिली आहेत. त्या शब्दांशी परिचय करून घेण्यासाठी सामूहिक गीत गायन करून मातृभूमीला वंदन करण्याचा विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात स्तुत्य उपक्रम केला.
वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले होते जे त्यांच्या आनंद मठ (१८८२) या सर्वात प्रसिद्ध कादंबरीचा एक भाग होता जो संन्यासी बंडाच्या घटनांवर आधारित आहे. हे गीत बंगाली भाषेत आहे.
वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये गायले होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेत घोषणा केली की, भारतातील ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या वंदे मातरम या गीताचा गौरव करण्यात यावा. जन गण मन बरोबर समानतेने आणि त्याला समान दर्जा दिला पाहिजे.
ह्याच निमित्ताने नुकताच २४ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या सुमारे ४५०० विद्यार्थी आणि २५० हुन जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी नवीन विवा महाविद्यालयाच्या प्रांगणात वंदे मातरम् गीताचे प्रा. पद्मजा अभ्यंकर ह्यांच्या सोबत सामूहिक गायन केले. ह्यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे ट्रस्ट अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सचिव अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, समन्वयक नारायण कुट्टी आणि प्राचार्या मुग्धा लेले, उपप्राचार्य सुभाष शिंदे, मार्गदर्शिका कल्पना राऊत ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment