शिवसेना शाखा क्रमांक १२३ डॉ.भारती बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न !
घाटकोपर, (केतन भोज) : शिवसेना शाखा क्रमांक १२३ डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभा प्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पुरुष, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांचा संवाद मेळावा लाड शाखीय वाणी समाज हॉल, विक्रोळी पार्कसाईट येथे पार पडला. यावेळी माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व घाटकोपर विधानसभा प्रमुख सुबोध बावदाने यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत शाखा क्रमांक १२३ मधील प्रत्येक विभागातील ज्या काही समस्या असतील त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या जवळ मांडून आपण त्या तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी सांगितले.तसेच या मेळाव्यात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही आपल - आपल्या विभागातील नागरी समस्या डॉ. भारती बावदाने आणि डॉ. सुबोध बावदाने यांच्या जवळ मांडल्या असून ज्या काही समस्या असतील त्या आपण सोडविणार असल्याचे डॉ. सुबोध बावदाने यांनी सांगितले. तसेच यावेळी होऊ घातलेल्या महानगपालिकेच्या निवडणूकीत डॉ. भारती बावदाणे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केला. तसेच या मेळाव्यात सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांना डॉ.भारती बावदाने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी या संवाद मेळाव्याला शाखा क्रमांक १२३ मधील असंख्य महिला,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.भारती बावदाने व डॉ.सुबोध बावदाने यांनी आतापर्यंत विभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत सहा मोफत आरोग्य शिबिर कॅम्प आयोजित केले होते. यावेळी या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून, विभागात आणखीन ही मोफत आरोग्य शिबीर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच लवकरच विभागातील युवक - युवतींसाठी मोफत नोकरी मेळावा ही आयोजित करण्यात येणार आहे. डॉ.भारती बावदाने व डॉ.सुबोध बावदाने यांचे आतार्यंतचे शाखा क्रमांक १२३ साठी मोठे योगदान आहे.
No comments:
Post a Comment