Tuesday, 29 April 2025

देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा !

देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा !

** लोकनिर्माणचे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण

कोकण (शांताराम गुडेकर) :

          १ मे हा महाराष्ट्र आणि कामगार दिन, यादिवशी लोकनिर्माण वृत्तपत्र गेली दहा वर्षे देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिकपणे साजरा करत आहे. यावेळी कर्तृत्ववान महिला आणि गुणवंत विशेष अधिकारी यांना लोकनिर्माण सन्मान  हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतो.
       यावर्षी लोकनिर्माण प्रतिष्ठान या राष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लोकनिर्माण सन्मान २०२५ हा पुरस्कार महिला आणि कामगार क्षेत्रातील विशेष अधिकारी यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लोकनिर्माण प्रतिष्ठानची घोषणा १ मे २०२४ रोजी  सामाजिक कार्यकर्ते आणि सहसंपादक युयुत्सु आर्ते यांनी केली होती.वर्षभरात या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. आणि याच दिवशी हे पुरस्कार वितरण लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गुरुवार दिनांक १/५/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता हाॅटेल पार्वती पॅलेस सभागृह, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे होणार आहे. याच कार्यक्रमात लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून डिजिटल लोकनिर्माण मिडिया या नावाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला आणि पुरुष यांनी उपस्थित राहावे असे आवाहन साप्ता. लोकनिर्माण संपादक बाळकृष्ण कासार,लोकनिर्माण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रम चे आयोजन !!

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विवि...