श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!
पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथसंप्रदायातील श्री.गोरक्षनाथ महाराजांचा जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी चैत्र-वरूथिनी एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने अन् उत्साहात साजरा होत आहे .
मंगळवार दिनांक २२एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान अभिषेक व कलश पूजन, श्रींची महाआरती नंतर भजन , हरिपाठ कार्यक्रम, रात्रौ महाप्रसाद, त्यानंतर ह.भ. प प्राची मंदार व्यास यांचे कीर्तन अशा प्रकारची कार्यक्रमाची रूपरेषा आहे.
तर गुरुवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी ०९:३० वाजता श्रींच्या जन्माचे ह.भ. प प्राची मंदार व्यास यांच्याकडून कीर्तन होऊन जन्मसोहळा साजरा होईल .जन्मसोहळ्यानंतर महाप्रसाद, दुपारी १ वा. भजन तसेच रात्रौ १२ वाजता श्रींच्या प्रदक्षिणा होतील.
उत्सवासाठी विठ्ठलनगर, घोडाबंदर, मंत्रीवाडी, मलेघरवाडी, ठाकुरबेडी, जनवली बेडी, तामशीबंदर, बोरकर वाडी, पैरणकर वाडी, बहिराम कोटक लाखोले, म्हात्रे ठाकूर वाडी व इतर बेडेकरी मंडळींचे सहकार्य लाभणार आहे. तरी या श्री गोरक्षनाथ उत्सव सोहळ्याचा पंचक्रोशीतील सर्व भाविक, बंधु -भगिनी अशा सर्वांनी लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment