सुविधा नाहीत तर कर नाही - केडिएमसी आयुक्तांना शंखेश्वर प्रेसिडेन्सी, टावरीपाडा परिसरातील नागरीकांचे निवेदन !!
कल्याण, प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील शंखेश्वर प्रेसिडेन्सी, टावरीपाडा परिसरातील नागरिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका विरोधात एल्गार पुकारत नागरीसुविधा नाही तर कर नाही अशी भूमिका घेतली आहे.
मागील १५ वर्षांपासून प्रलंबित शंकेश्वर प्रेसिडेन्सी,टावरीपाडा -गोदरेज हिल प्रलंबित डि पी रस्ता, कल्याण स्टेशन येथून रिक्षा साठी धावपळ, आर टि ओ ते शंखेश्वर प्रेसिडेन्सी टावरीपाडा नागरीकांना चालत पायपीट करावी लागते, सार्वजनिक वाहतूक सुविधेचा वनवा, खड्डे पडलेले रस्ते, कल्याण स्टेशन परिसरातील ट्राफिक समस्या, अशी दयनीय अवस्था असुन कर वसूल करण्यासाठी बॅनर बाजी करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला परिसरातील समस्या दिसत नाही, वारंवार पत्र व्यवहार करून कोणतीही ठोस कार्यवाही नाही व पत्रांना उत्तरही मिळत नाही.
नागरीकांनी याबाबत तीव्र नाराजगी व्यक्त "जोपर्यंत सुविधा मिळत नाही तोपर्यंत कर न भरणाऱ्याचा" निर्धार केला आहे.
असा ठरावच शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन कमीटी ने मंजूर केला असून तसे निवेदन नुकतेच स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा बजरंग तांगडकर यांनी सर्व नागरिकांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना तथा प्रशासक श्री अभिनव गोयल यांना पत्र दिले, असून यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उत्तराची प्रतिक्षा नागरीक करत आहे
दरम्यान मागील १५ वर्ष मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला शंखेश्वर प्रेसिडेन्सी सोसायटीतील ६५० सदनिका असलेल्या सदस्यांनी अंदाजीत ४ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये कर भरला असून याबद्दल्यात काय सुविधा दिली हा प्रश्न नागरीक विचारत आहेत.
याबाबत स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रालय कार्यालयात पत्रव्यवहार करत हि समस्या मांडली.
आभार
ReplyDelete