चिपळूण ढाकमोली गावात सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला हिरा शाहीर - सचिन धुमक
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत अनेक रत्ने जन्माला आली आणि त्यांनी त्यांच्या जन्मभूमीच नाव मोठ केलं. असच एक कोकण भूमीत तयार झालेलं रत्न म्हणजे शाहीर सचिन धुमक चिपळूण ढाकमोली गावात सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला हिरा. बालपणापासून कलेची आवड जोपासताना वयाच्या पाचव्या वर्षी कोकणची लोककला नमन मध्ये श्री कृष्णाची भूमिका साकारत कला क्षेत्रात पदार्पण केले.
शालेय शिक्षण आपल्या मामाच्या गावी म्हणजे वहाळ या ठिकाणी पूर्ण करत असताना कैलासवासी लोकप्रिय शाहीर बाबाजी घडशी यांचा कलेचा वसा जोपासत त्यांचे गुण आत्मसात करत गीत लेखनास सुरुवात केली.. आजवर आपल्या लेखणीतून अनेक समाजप्रबोधनपर गीत रचना करून ती स्वरबद्ध करत समाजप्रबोधनाचे कार्य करत असतानाच नमन साठी ऐतिहासिक वगनाट्य लिहिण्यास सुरुवात केली. इतिहासाला अपरिचित असलेल्या योद्ध्याची कलाकृती रामजी पांगेरा त्यातील एक नाट्यकृती गीतकार, गायक, आणि कलाकार अशा वेळी भूमिका साकारत आपल्या पहाडी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत महाराष्ट्र गौरव भूषण मधुकर पंदेरे आणि लोकप्रिय शाहीर तुषार पंदेरे, जगन्नाथ रसाळ यांसारख्या गुरूंच्या छत्रछायेखाली बाबू रंगेले घराण्यातील तुरेवाले शाहीर म्हणून शाहिरी करण्यास सुरुवात केली. आणि आपल्या प्रबोधनात्मक शाहिरी लेखणीतून समाज प्रबोधन करत असतानाच स्वतः वस्ताद म्हणून अनेक शिष्य घडवत आहेत, सुशांत, जितेश, सागर, दीपक, किरण, सुरज, भावेश, रुपेश, महेश हे त्यांची शिष्य मंडळी भविष्यात नक्कीच रंगभूमीवर नाव कमावताना दिसून येतील.मुंबईच्या रंगमंचावर आपली शाहिरी कला सादर करत असतानाच दूरचित्रवाणी वरील कलर्स मराठी वाहिनीवर आपली कोकणची लोककला नमन सादर करण्याची संधी मिळाली.
आपल्या प्रबोधनात्मक लेखणीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आणि त्यातून उदयास आला टीम सचिन चाहते परिवार. आपल्या प्रमाणेच प्रत्येकाकडे काही ना काही अंगीभूत कला दडलेली आहे, हा विचार त्यांचा मनाला स्वस्थ बसू देत नव्हता आणि मग त्यांनी विडा उचलला तो आपल्या चाहते परिवारातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा त्यांच्यातील कलागुणांना हेरून त्यांच्यातील कलाकार घडवण्याचा आणि त्यातूनच त्यांनी आपल्या निवडक चाहत्यांसमोर भारूडची संकल्पना मांडली. आणि आपल्या चाहत्यांच्या सहकार्याने आज कोकणची लोककला चाहत्यांचे बहुरंगी भारुड ही संकल्पना साकार झाली.
कोकणातील तळागाळातील कलावंतांना हक्काच व्यासपीठ सचिन धुमक आणि त्यांच्या टीम सचिन चाहते परिवार यांनी उपलब्ध करून दिले. हे सर्व करत असतानाच टीम सचिन चाहते परिवार आणि शाहीर सचिन धुमक कला क्षेत्रासोबत शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करताना दिसून येतात.. मग ते क्रिकेट सामन्याचे आयोजन असो किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला मदत करण्यात यांचा मोठा हातखंडा आहे.त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून लोकसेवा महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्कार तसेच सह्याद्री गौरव भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पण त्यांचा कुठे गवगवा केला नाही, आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करणारा हा कलावंत कायमच प्रसिद्धीपासून थोडा दूर राहून आपले कार्य करताना दिसून येतो.
आपल्या शाहिरी प्रबोधनात्मक लेखणीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच. त्यांचा टीम सचिन चाहते परिवार हा कला क्षेत्रसोबतच क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करताना दिसून येतो मग ते क्रिकेट सामन्याचे आयोजन असो किंवा एखाद्या गरीब गरजू रुग्णाला मदतीचा हात असो शाहीर सचिन धुमक आणि त्यांचा टीम सचिन चाहते परिवार कायमच सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवताना दिसून येतो. यशाचे शिखर गाठत असताना अचानक ओढवलेलं आजारापणवर जिद्दीने मात करत. उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अवलिया जोमाने काम करत आहे.हे सर्व करत असताना त्यांना त्याच्या कुटुंबाने आणि टीम सचिन चाहते परिवार यांची साथ लाभली त्यामुळेच आज चाहत्यांचे बहुरंगी भारुड ही संकल्पना साकार झाली.
कोकणातील हौशी कलाकार यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे चिपळूण ढाकमोली गावचा अवलिया शाहीर सचिन धुमक आणि त्यांचा टीम सचिन चाहते परिवार तर्फे शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी दादर पश्चिम येथील प्रसिद्ध अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे रात्री ७:३० वा. शक्तीवाले शाहीर विनोद फटकरे आणि तुरेवाले शाहीर सचिन धुमक यांच्यात होणाऱ्या शक्ती-तुरा सामना कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा....! कोकणातील ही लोककला शाहीर मंडळी जोपसत आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी रसिक मायबाप आपल्या सहकार्याची गरज आहे.आम्ही तर सज्ज झालो आहोत कार्यक्रम पाहायला. तुम्ही या.. तुमच्या मित्र परिवार यांना सांगा.. सोबत घेऊन या कारण लोप पावत चाललेली ही कला जोपासायची असेल तर मुंबई मध्ये होणाऱ्या प्रत्येक शक्ती-तुरा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहा.
शब्दांकन -
शिवप्रेमी दीपक कावणकर
संकलन -श्री. शांताराम गुडेकर (+91 98207 93759)
No comments:
Post a Comment