"सिद्धार्थ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न" !
आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने 'आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) काल साजरा केला. एनएसएस कार्यक्रम अधिकारी, प्रा. विशाल करंजावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ८.३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला होता.
या कार्यक्रमात त्यांनी सहभागीं विद्यार्थी व शिक्षकांना विविध योग आसने, श्वासोच्छवासाचे प्रकार, सूर्यनमस्कार आणि त्याचे शरीराच्या विविध अवयवांना होणारे फायदे शिकवले. तसेच आपले दैनंदिन आहार कसा असावा याबद्दल देखिल सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात ३० विद्यार्थ्यांसह बर्यापैकी शिक्षकही सहभागी झाले होते. उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विष्णू भंडारे, डॉ. सुनिल गायकवाड तसेच काही माजी विद्यार्थी यांच्यासह इतरही शिक्षकांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या' या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.
*-डॉ. विष्णू भंडारे, मुंबई प्रतिनिधी*
No comments:
Post a Comment