भुमाफियाचा पत्रकार/ समाजसेवक अण्णा पंडित व विकास गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला !!
** पत्रकार संघटना तसेच समाजातील सर्व स्तरातून निषेध
मुंब्रा - मुंब्रा येथील मेक इंडस्ट्रियल इस्टेट मधील टोरांटो कार्यालयासमोर एक धक्कादायक घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष *महेंद्र ऊर्फ अण्णा पंडीत* यांच्यावर भुमाफिया अरविंद चिपळूणकर याने भ्याड हल्ला केला.
या हल्ल्यात अण्णा पंडीत हे सुदैवाने बचावले असले तरी त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत अनुसूचित जातीतील पिडीत व्यक्ती *विकास गायकवाड* हे देखील होते. आरोपी चिपळूणकर याने प्रथम गायकवाड यांना जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर अण्णा पंडीत यांच्यावरही आक्रमक हल्ला केला.
अण्णा पंडीत हे विकास गायकवाड यांना अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१५ मधील तरतुदीनुसार न्याय मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत करत होते. याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पत्रकार व समाजसेवक अण्णा पंडीत आणि पिडीत विकास गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटना तसेच विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त आदरणीय आशुतोष डुंबरे यांना निवेदन देत आरोपी अरविंद चिपळूणकर याला तात्काळ अटक करून त्याचेवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित हल्लेखोरास अटक करून गुन्हा दाखल न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आखिल भारतीय मातंग सेनेचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष *मोहन गवळी* यांनी दिला आहे. सदर घटनेने *पत्रकार सुरक्षा* आणि *दलित अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेबाबत* प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
जाहिर निषेध
ReplyDeleteया सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होण गरजेचे
ReplyDeleteआहे.. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग कराव.