Wednesday, 9 July 2025

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !!

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !!
मुंबई, दि. ९, प्रतिनिधी  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी. २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. १९ जुलै, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध भागातील स्पर्धकांनी पालघर  जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा मुख्यालय, प्रशासकीय इमारत - ब, तळमजला, कक्ष क्र. 008‌कोळगांव, पालघर - बोईसर रोड ता. जि. पालघर, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

वृत्तांत - जयेश शेलार 
जेष्ठ पत्रकार, संपादक/ वाडा तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)

No comments:

Post a Comment

ठाण्यात ‘नवदुर्गा वेलनेस सायकल राईड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ! ठाणे, प्रतिनिधी : महिलांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यास...