Wednesday, 9 July 2025

कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुण व्यक्तींना "कोकण युवा सन्मान पुरस्कार २०२५" पुरस्काराने होणार गौरव !!

कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुण व्यक्तींना "कोकण युवा सन्मान पुरस्कार २०२५" पुरस्काराने होणार गौरव !!

** आम्ही कोकणकर पुरस्कृत कोकण सन्मान सोहळा १३ जुलै२०२५ रोजी दादरच्या श्रीछत्रपती शिवाजीमहाराज नाट्य मंदिरात

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             कोकणच्या मातीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तुत्वान व्यक्तींना एकत्र आणत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत, आम्ही कोकणकर संघटनेच्या वतीने कोकण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे‌. हा रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता श्री शिवाजी नाट्यमंदिर , दादर (मुंबई) येथे संपन्न होणार आहे.
             आम्ही कोकणकर ही संघटना गेली दहा वर्षे कोकणातील तरुण पिढीला एकत्र आणत , कोकणच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे. विशेषत: कोकणातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, त्यांना योग्य संधी मिळून देण्यासाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे. "कोकण सन्मान सोहळा" या कार्यक्रमाद्वारे कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुण व्यक्तींना "कोकण युवा सन्मान पुरस्कार २०२५" हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. कार्यक्रमात धमाल, मस्ती, कॉमेडी, प्रबोधनपर, मनोरंजन आणि कोकणवासीयांसाठी खास सांस्कृतिक सादरीकरण पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यात मनोरंजन म्हणून गर्जना- कहाणी हिंदुत्वाची ही नाट्यकला कृती दाखवण्यात येणार आहे. कोकण सन्मान सोहळा रसिक प्रेक्षकांसाठी मोफत असून कोकणवासीयांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संघटनेचे संस्थापक /लेखक /दिग्दर्शक कृष्णा नंदा शांताराम येद्रे यांनी केले आहे. 

चला एकत्र येऊन साजरा करूया उत्सव कोकण संस्कृतीचा..!

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका व अधिक माहितीसाठी ९७७३१४२८१९ /८६५२१४१५६१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...