Thursday, 3 July 2025

वीर वाजेकर महाविद्यालयात 'पदवी वितरण समारंभ' संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'पदवी वितरण समारंभ' संपन्न !!

उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : २ जुलै-२०२५ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे महालण येथे पदवी वितरण समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाले. शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये विविध शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आमोद ठक्कर प्रभारी प्राचार्य यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाचा निकाल हा ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागलेला आहे, प्राध्यापक संशोधन कार्यामध्ये अग्रेसर आहेत मुलंही संशोधन कार्यात सक्रिय सहभाग घेतात. 

मुलांसाठी ३४ शॉर्ट टर्म कोर्स उपलब्ध आहेत सुसज्ज आ यटी लॅब, लॅंग्वेज लॅब, जिमखाना, उत्कृष्ट ग्रंथालय अशा सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जीबू कुरिअन ईटी, सी.ई. ओ. (डी. पी.वर्ल्ड, न्हावा शेवा) यांनी आपल्या मनोगतातून नव्वदच्या दशकातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर ते म्हणाले की आजचा विद्यार्थी हा अधिक चौकस, सजग आहे नव्या तंत्रज्ञानाने तो परिपूर्ण असल्याने आजच्या स्पर्धेच्या युगात तो चांगली व उत्तम नोकरी शोधू शकतो.आम्ही आमच्या बंदरात अशा प्रकारच्या हुशार विद्यार्थ्यांना जास्तीत -जास्त अनुभवाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करू. बाळाराम पाटील अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती यांनी आपल्या मनोगतातून पाहुण्यांच्या भाषणाचा सार मांडला. महाविद्यालय अधिक प्रगतीकडे जात आहे. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजेच्या सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा कोर्स सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येत आहे याची माहिती दिली. 

पदवीधर झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. माजी खासदार रामशेठ ठाकूर सदस्य मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा व पी.जे.पाटील उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सुधीर घरत जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, भावनाताई घाणेकर सदस्या महाविद्यालय विकास समिती, उपप्राचार्य गजानन चव्हाण, प्रो.अनिल पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रेया पाटील व डॉ.सुजाता पाटील यांनी केले. प्रा.संतोष देसाई अध्यक्ष पदवी वितरण समारंभ समिती यांनी आभार व्यक्त केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच सर्व पदवी प्राप्त विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महागाई भत्त्यात ₹ शुन्य वाढ — भारतीय मजदूर संघाने केला तीव्र निषेध !!

महागाई भत्त्यात ₹ शुन्य वाढ — भारतीय मजदूर संघाने केला तीव्र निषेध !! पुर्नलोकन करून कामगारांना न्याय द्यावा यासाठी लेबर ऑफीस येथे आंदोलन. र...