Tuesday, 1 July 2025

रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण !!

रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण !!

चोपडा, प्रतिनिधी - रोटरी या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे वर्ष १ जुलै ते ३० जून या कालावधीचे असते. दरवर्षी नवीन व्यक्तीकडे रोटरीची पदे आनंदाने सोपविली जातात. ३० जून रोजी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. डॉ. ईश्वर सौंदणकर व मानद सचिव रोटे. भालचंद्र पवार यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह क्लबचे स्वप्न असणारा प्रकल्प - रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण व इतर दोन प्रकल्प पूर्णत्वास नेत रोटरी वर्षाची सांगता केली. 

रोटरी भवन येथे झालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे भावी प्रांतपाल रोटे. डॉ. राजेश पाटील (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मंचावर क्लबचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव भालचंद्र पवार, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील, क्लबचे भावी अध्यक्ष आशिष जयस्वाल, सचिव विश्वास दलाल, कोषध्यक्ष निखिल सोनवणे, रोटरी सेवा संस्थेचे सचिव विलास एस. पाटील, प्रकल्प मार्गदर्शक नितीन अहिरराव व या रुग्णवाहिकेचे संचालन करणारे डॉ. दुर्गेश जयस्वाल हे उपस्थित होते. रोटरी रुग्णवाहिका जयस्वाल हॉस्पिटल चे संचालक डॉ. दुर्गेश जयस्वाल यांना सुपूर्त करण्यात आली ह्यावेळी सर्व रोटरी सदस्य बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्ती झाल्याच्या आनंद दिसून आला. याप्रसंगी डॉ. राजेश पाटील, आशिष गुजराथी, नितीन अहिरराव यांनी मनोगते व्यक्त केली तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी व प्रास्ताविक डॉ. सौंदाणकर यांनी व आभार प्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले.

याप्रसंगी क्लबचे आशिष गुजराथी, संजीव गुजराथी, पंकज बोरोले, प्रवीण मिस्त्री, लीना पाटील, अरुण सपकाळे, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, शिरीष पालीवाल, रुपेश पाटील, चंद्रशेखर पाटील, शशिकांत पाटील, डॉ. नीता जयस्वाल, पुनम गुजराती, विलास पी. पाटील अनुराग चौधरी, गौरव महाले यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्लबतर्फे बाजारपेठेत १००० कापडी पिशव्या मोफत वाटून पर्यावरण संवर्धनास मदत केली. यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा कडून ज्या महिलांना शिलाई मशीन देण्यात आले होते त्यांनाच कापड देऊन त्यांच्याकडून या पिशव्या शिवून घेतल्या यातून महिला सबलीकरण व पर्यावरण दोघेही हेतू सध्या झाले, यासाठी प्रकल्प प्रमुख डॉ पराग पाटील होते. तसेच प्रेरणा मतिमंद विद्यालयातील मतिमंद विद्यार्थ्यांसाठी दंत - नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर सकाळी आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात डॉ. राहुल पाटील डॉ. तृप्ती पाटील व डॉ. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. विविध प्रकल्पांचे यशस्वी आयोजन करत रोटरी वर्षाची मोठ्या उत्साहात व आनंदात सांगता करण्यात आली. रोटरी क्लब चोपडाच्या सदस्य बंधू व भगिनी यांनी उपस्थिती दिली.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...