**पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड मा के नाम" उपक्रमांतर्गत ६५० झाडांचे वृक्षारोपण**
मुरबाड, (श्री.मंगल डोंगरे) : भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत मेरा युवा भारत ठाणे यांच्या वतीने, महाराष्ट्र युवा संघ कल्याण (जिल्हा युवा संस्था पुरस्कार - महाराष्ट्र शासन) व वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० जुलै २०२५ रोजी किशोर गाव (तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे) येथे पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड मा के नाम" हा वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण ६५० झाडे लावण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून –श्री. संजूदास हेमा राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी – मुरबाड पश्चिम, स्काय डायव्हर अजित कारभारी, अध्यक्ष – महाराष्ट्र युवा संघ व राज्य युवा पुरस्कार (महाराष्ट्र शासन २०१३-१४) श्री. साहेबराव बळीराम खरे, परिमंडळ वन अधिकारी – किशोर, श्री. विनायक तानाजी पवार, वनरक्षक श्री. साहिल दीपक पवार, वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन मुरबाड श्री. निलेश आत्माराम जाधव, वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन मुरबाड, श्री. प्रविण भालेराव, संस्थापक – वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन श्री. अजिंक्य मंगल डोंगरे, सचिव – गर्जा प्रतिष्ठान मुरबाड, हे मान्यवर उपस्थित होते.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक आणि युवतींनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. एकूण ५१ युवक-युवतींना मेरा युवा भारत ठाणे यांच्याकडून भारत सरकारचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा उपक्रम मेरा युवा भारत ठाणेच्या जिल्हा युवा अधिकारी मनीषा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
Nice Tree plantation programme by Mera Yuva Bharat Thane
ReplyDelete