Thursday, 31 July 2025

महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीच्या सचिव पदी सुरेंद्र आढाव यांची नियुक्ती !!

महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीच्या सचिव पदी कल्याण येथील सुरेंद्र आढाव यांची नियुक्ती !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याणमधील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, तथा कल्याण डोबिवली महापालिका माजी परिवहन सदस्य सुरेन्द्र आढाव यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या यादीत आढाव यांचे नाव आहे.

सुरेंद्र आढाव यांनी या आधी युवक कॉग्रेस कल्याण शहर उपाध्यक्ष, युवक कॉंग्रेस कल्याण शहर जिल्हा प्रवक्ता, अनुसूचित जाती विभाग कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव अशी पदे भूषवली असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रदेश सचिवपदाची जवाबदारी सोपवली आहे. आढाव यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे काँग्रेस पक्षासह सर्वच राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांकडून अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तर पक्षाशी असलेली निष्ठा आणि प्रामाणिक कार्य पाहता माजी आमदार संजय दत्त यांच्या आशिर्वादाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी आपली पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. आपण गरीब परिवारातून आणि दलित वर्गातून असून देखील पक्षाने पुन्हा एकदा मोठी जवाबदारी दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी, विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रमेश चेनीथला, प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, व्ही. पी. व्यंकटेश, माजी आमदार संजय दत्त आणि पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे सुरेन्द्र आढाव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...