Friday, 4 July 2025

गुरु पौर्णिमा निमित्त चिरनेर ते वहाळ पायी पालखी दिंडी सोहळा !!

गुरु पौर्णिमा निमित्त चिरनेर ते वहाळ पायी पालखी दिंडी सोहळा !!

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) - गुरुवार १० जुलै २०२५ रोजी हिंदू धर्मातील प्रसिद्ध सणापैकी एक असलेले गुरुपौर्णिमा हा सण आहे. या गुरुपौर्णिमा सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी ॐ साई सेवा मंडळ चिरनेर तर्फे श्री महागणपती मंदिर चिरनेर (उरण) ते श्री साई मंदिर वहाळ (पनवेल) दरम्यान श्री साईबाबाची पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री महागणपती मंदिर चिरनेर येथून वारकरी दिंडी पदयात्रा गुरुवार दि १०/७/२०२५ रोजी सकाळी ११ वा. श्रीची आरती करून साई मंदिर वहाळ येथे प्रस्थान होणार आहे. यंदाचे हे पदयात्रेचे १३ वे वर्ष आहे.

सदर पदयात्रा यशस्वी करण्यासाठी गजानन फुंडेकर (कार्याध्यक्ष), अमित मुंबईकर (अध्यक्ष), नितीन नारंगीकर ( उपाध्यक्ष), संतोष चिर्लेकर (सचिव), प्रसाद पाटील (खजिनदार), बबन ठाकूर (सल्लागार), गजानन म्हात्रे (सल्लागार), हरिश्चंद्र मोकल (सल्लागार), रमेश म्हात्रे (सल्लागार) यांच्यासह ॐ साई सेवा मंडळ चिरनेरचे सर्व पदाधिकारी सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.

तरी सर्व साईभक्तांनी दिंडी मध्ये सहभागी होउन श्री साईचा कृपाशिर्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी, दिंडी मध्ये सहभागी होण्यासाठी अध्यक्ष अमित मुंबईकर फोन नंबर ८४५२९३७३८२, उपाध्यक्ष नितिन नारंगीकर ८४५४९३७९६६ यांच्याशी संपर्क साधावे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...