जयगड पोलीस ठाणे मार्फत गणपतीपुळे येथील झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये "दोन इसमांना अटक व 95% मुद्देमाल हस्तगत" करण्यात यश !!
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडी या संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या आहेत.दिनांक 26/08/2025 रोजी दुपारी 12.30 वा ते दिनांक 27/08/2025 रोजी दुपारी 01.15 वाजण्याच्या मुदतीत जयगड पोलीस ठाणे हद्दीमधील केदारवाडी- गणपतीपुळे, ता. जि. रत्नागिरी येथील राहणारे श्री. विरेंद्र शांताराम गोसावी, वय 42, यांच्या राहत्या खोलीच्या बाहेरील दरवाजाला लावलेल्या कुलुपाचा कोयंडा कापून दरवाजा उघडून त्या वाटे घरात प्रवेश करून घरातील कपाटातील लॉकर कोणत्यातरी हत्याराने उचकटून घरामधील ठेवलेले ₹2,36,200/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम फिर्यादी यांच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने घरफोडी चोरी करून अज्ञात इसमाने चोरून नेले होते म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून जयगड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 32/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (3), 331 (4), 305, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.हा गुन्हा घडल्याची माहिती पोलीस ठाण्यात प्राप्त होताच, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने जयगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. कुलदीप पाटील यांना मार्गदर्शन केले व त्यानुसार गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवून तपास पथक तयार करून पथकातील अंमलदार यांना अज्ञात आरोपीच्या शोधाबाबत सूचना दिल्या.जयगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने लागलीच दोन पथके तयार करून त्यांच्या मार्फत स्थानिक पातळीवर माहिती प्राप्त केली व सी.सी.टी.व्हि फुटेज तपासण्यात आले.मिळालेल्या माहितीच्या आधारे जयगड पोलीस ठाण्याच्या पथकांमार्फत या गुन्ह्यामध्ये दोन संशयित इसमांना 1) रोशन सुरेश जाघव वय-21 वर्षे रा. मेढे तर्फे फुणगुस, बौध्दवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी सध्या रा. गणपतीपुळे केदारवाडी, ता.जि. रत्नागिरी, 2) हैदर अजीज पठाण वय 27 वर्षे रा. झारणी रोड, नाफ्की चिकन सेंटर, जुना भाजी मार्केट, ता.जि.रत्नागिरी, सध्या रा. गणपतीपुळे, केदारवाडी, ता.जि.रत्नागिरी ताब्यात घेण्यात आले व दोन्ही आरोपी यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून ₹2,21,530/- किमतीचा 95% मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश प्राप्त केले आहे.तसेच या गुन्ह्यामध्ये वरील नमूद दोन्ही आरोपी यांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून यामधील आरोपी क्रमांक 2) हैदर अजीज पठाण यावर रायगड, मुंबई शहर व रत्नागिरी अश्या 3 जिल्हयांमध्ये यापूर्वी चोरी, घरफोडी सारखे एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.ही, कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
पो. उप नि. श्री. विलास दीडपसे,स.पो. फौ/417अनिल गुरव, पो.हेकॉ/1240 राहुल घोरपडे, पो.हेकॉ/456 मिलिंद कदम,पो.हेकॉ/316 मंदार मोहिते,पो.हेकॉ/1374 निलेश भागवत, पो.हेकॉ/305 संतोष शिंदे,पो.हेकॉ/1446 संदेश मोंडे,म.पो.कॉ/150 सायली पुसाळकर,पो.कॉ/72 निलेश गुरव, पो.कॉ/489 पवन पांगरीकर व पो.कॉ/859 आदित्य अंकार.
No comments:
Post a Comment