पुजे साठी गेले आणि मंदिरातच अडकले. !! **देवगाव धाकलेश्वर शिवमंदीरात दोन शिवभक्त अडकले.**
मुरबाड, दि. २०, (श्री.मंगल डोंगरे) : मुरबाड शहरा लगत असलेल्या देवगाव येथील धाकलेश्वर शिवमंदिरात देवदर्शनासाठी गेलेले दोन शिवभक्त नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे अडकून पडल्याने परिसरात चिंत्ता व्यक्त केली जात आहे.
या बद्दल मिळालेली माहीती अशी कि, देवगाव गाव हद्दीत मुरबाडी नदी पात्रात प्रसिद्ध असे धाकलेश्वर महादेवाचे शिवमंदिर आहे. तेथे मुरबाड परिसरातील भाविक भक्तजन श्रद्धेने देवदर्शनासाठी जात असताना. असेच दोन शिवभक्त काल देवदर्शनासाठी गेले असता सोमवार दिनांक १८ तारखेपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि मंदिरात गेलेले शिवभक्त श्री .केशव वारघडे व ह. भ. प. नागो राऊत, हे दोन शिवभक्त बुधवार दि. 20 आगस्ट पर्यंत धोधो पडणा-या पावसामुळे या मंदिराच्या चारी बाजूला पाणीच पाणी झाल्याने या भक्तांना बाहेर येता न आल्याने ते या मंदिरातच अडकले आहेत. याची खबर मुरबाड चे तहसीलदार अभिजीत देशमुख यांना मिळताच त्यांनी तात्काळ अग्नीशामक दलाचे जवान घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने उपाय योजना करता येत नव्हती. शेवटी ड्रोनच्या साहाय्याने खाण्याच्या वस्तू व नायलान दोरी त्यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर आग्नीशामक दलाची मदत घेऊन त्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार देशमुख यांनी दिली.तसेच घटनास्थळी तलाठी व मंडळ अधिकारी, मुरबाड नगरपंचायत चे मुख्याधिकारी मनोज म्हसे,ही त्यांच्या फौजफाट्यासह उपस्थीत होते, देवगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.स्वप्नील तुपे, त्यांचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असताना, पाण्याचा वाढता प्रवाह कमी होत नसल्याने आज अखेर अडकलेल्या त्या दोन्ही शिवभक्तांना पाण्याचा प्रवाह कमी होईल पर्यंत त्या धाकलेश्वर शिवमंदिरात मुक्काम करावा लागेल अशी माहिती प्रशासकीय यंत्रणे कडून देण्यात आली असुन, अडकलेले हे दोन्ही शिवभक्त सुखरूप आहेत.
No comments:
Post a Comment