Tuesday, 26 August 2025

वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : जनसेवेतून आनंद देणाऱ्या उरण तालुक्यातील  वशेणी गावात कार्यरत असणाऱ्या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यिक मोरेश्वर बागडे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी भागुबाई विद्यालयाच्या प्राचार्या अनुराधा काठे, उरण पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा म्हात्रे, नवीन शेवे केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर म्हात्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव पाटील, माजी सरपंच प्रसाद पाटील, ग्रामपंचायत सदस्या प्रीती पाटील, साई सेवक जगन्नाथ पाटील, रमेश पाटील, महेंद्र गावंड, देविदास पाटील, पुरण पाटील, बासरी वादक प्र.ना. बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. छोट्या छोट्या उपक्रमातून जनसेवेचे मूल्य जपणारे वशेणी इतिहास संपादकीय मंडळ म्हणजे देशाची सेवा करणारे मंडळ आहे.असे गौरवोदगार यावेळेस साहित्यिक व इतिहास अभ्यासक मोरेश्वर बागडे यांनी व्यक्त केले. 

या वर्धापन दिनानिमित्त वशेणी व उरण  तालुक्यातील आपापल्या परीने विविध क्षेत्रात जनसेवा करणाऱ्या दहा व्यक्तींना मंडळाकडून जनसेवा पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
1) सौ. जान्हवी जितेश कडू, रा.जि.प शाळा रानसई वाडी (शैक्षणिक सेवा पुरस्कार)
2) श्री नागनाथ कुठार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोरा पोलीस स्टेशन (पर्यावरण सेवा पुरस्कार)
3) श्री नागेश पोशा पाटील, पुनाडे
(सामाजिक सेवा पुरस्कार)
4) श्री संदीप रामदास पाटील,
बोकडविरा (संघटन सेवा पुरस्कार)
5) श्री शशिकांत सहदेव ठाकूर, वशेणी (समालोचन सेवा पुरस्कार)
6) कुमारी आम्रपाली कमलाकर पाटील, वशेणी (दांडपट्टा कला संस्कृती जतन पुरस्कार)
7) श्री बळीराम चांगदेव म्हात्रे, वशेणी (सामाजिक सेवा पुरस्कार)
8) श्री टिळक नामदेव पाटील, वशेणी (लग्न देवकार्य सेवा पुरस्कार)
9) श्रीमती लिलाबाई जरासंध म्हात्रे, वशेणी (लग्नकार्य धवलारीन सेवा पुरस्कार)
10) श्री भरत लक्ष्मण पाटील, वशेणी (नाट्यप्रबोधन सेवा पुरस्कार) 

आज समाजाची विचारधारा बदलत आहे, तरुणांची जीवनमूल्य देखील बदलत आहेत.असा बदलता समाज दिशाहीन होऊ नये म्हणून जनसेवा करणाऱ्या लोकांचे कार्य दीपस्तंभा सारखे पुढे यायला हवे याच हेतूने वशेणी इतिहास संपादकीय मंडळ जनसेवा पुरस्काराचे आयोजन करते .असे मत यावेळी मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे यांनी मांडले. दिवसागणिक अनेक नवनवीन सामाजिक मंडळे, सांस्कृतिक मंडळे जन्माला येतात आणि एक-दोन वर्षात समाप्त सुद्धा होतात. परंतु स्थापनेपासून ते आज तगायत  सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवणारे वशेणी इतिहास संपादकीय मंडळ कौतुकास पात्र आहे असे गौरवोदगार उरण तालुक्याच्या माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले, त्याचप्रमाणे शाळेतील मुलांना स्कूल बॅग वाटप, मरू आई व बापदेव मंदिरांना डस्टबीन वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गावंड आणि बी.जे.म्हात्रे यांनी केले.सदर कार्यक्रमास संदेश गावंड, सतीश पाटील, पुरुषोत्तम पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, हरेश्वर पाटील, कैलास पाटील, हरिश्चंद्र ठाकूर, गणेश खोत, अनंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...