अनुशक्तीनगरात मनसेच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
अनुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेशोत्सवासाठी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर आधारित या स्पर्धेमुळे अनुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रात भक्तिमय वातावरणासोबतच सामाजिक संदेशही दिला जात आहे.
नवनिर्वाचित विभागाध्यक्ष रवींद्र शेलार आणि महिला विभागाध्यक्षा अमिता गोरेगावकर यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले असून, राज्य उपाध्यक्ष नवीन भाऊ आचार्य आणि माजी विभागाध्यक्ष रवींद्र गवस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. उपविभागाध्यक्ष सचिन ससाने, विशाल कदम, राजेश पूर्वे, प्रांजल राणे कस्पटे, लक्ष्मी ताई, विद्यार्थी सेनेचे गजेंद्र कांबळे, योगेश घनदाट, रुपेश बोरकर तसेच शाखाध्यक्ष मंगेश पडवळ, संतोष पवार, मदन गाडेकर, प्रसाद सनगरे, जयेश ठाकूर, संदीप बनसोडे, रोहित शेट्टी आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
गणेशोत्सव हा जातीपातीच्या पलीकडे साजरा केला जाणारा महाराष्ट्राचा प्रमुख सण आहे. “जातीपाती मला न कळते, मला न कळे कोणाचा… एवढेच माहीत मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा” असे विचार व्यक्त करून विभागाध्यक्ष शेलार यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकला.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी प्रथम पारितोषिक ₹५१,०००, द्वितीय ₹२५,००० तर तृतीय ₹१५,००० ठेवण्यात आले आहे. घरगुती गणेशोत्सवासाठी प्रथम पारितोषिक ₹११,०००, द्वितीय ₹७,००० व तृतीय ₹५,००० अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली असून सर्व सहभागींना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.या उपक्रमाचे अभिनंदन मनसे नेते अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, योगेश सावंत, कर्णबाळा दुनबळे, राजाभाऊ चौगुले, रीठा गुप्ता व स्नेहल जाधव यांनी केले आहे. पारितोषिक वितरण समारंभ घटस्थापनेच्या दिवशी पार पडणार आहे.
No comments:
Post a Comment